त्या अधिकार्याला मारहाण झाली; त्याबद्दल मी शहराच्यावतीने दिलगिरी व्यक्त करतो:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
काल दि. २२/०७/२०२१ रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात येऊन बांधकाम विभागात तोडफोड करण्यात येऊन उपमुख्याधिकारी श्री.सुनील गोर्डे यांना मारहाण करण्याचा भ्याड प्रकार घडला. प्रभारी मुख्याधिकारी श्री.डोईफोडे यांच्या आदेशावरून सदरचे अतिक्रमण हटविले गेले.
ज्या सुनील गोर्डे साहेबांनी अनेक वर्षे लष्करात सेवा बजावून आपले संरक्षण केले त्यांच्यावर हल्ला होणे हे कोपरगाव शहरासाठी खाली मान घालायला लावणारे आहे. त्याबद्दल मी शहराच्यावतीने दिलगिरी व्यक्त करतो.
हे प्रकरण अंगलट यायला लागल्यावर ” छ. शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे” यांच्या प्रतिमांची विटंबना झाल्याचे कुभांड रचण्यात आले आहे. त्यादिवशी केलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईचे संपुर्ण व्हिडीओ शुटिंगही उपलब्ध आहे. आपल्या हातून एखादी चुक घडल्यानंतर महापुरुषांच्या आड लपायचे कशाला? खरे तर असे करून संबंधितांनीच महापुरुषांची विटंबना केली आहे असे वाटते. घटनेशी संबंधित सर्वजण असे काही करतील हे खरेच वाटत नाही. त्यांनी कशामुळे असा प्रकार केला हेही समजत नाही. ते सर्वजण माझे मित्र-परिचित असून संपर्कातही असतात. असे प्रकार घडले तर कोपरगाव शहरात कोणताही अधिकारी यायला धजावणार नाही. त्यामुळे विकासकामे थांबून शहराचेच नुकसान होणार याचेही भान आपण सर्वांनीच ठेवले पाहिजे. मी ही असंख्यवेळा अनेकदा सार्वजनिक हितासाठी आंदोलने केलेली आहेत, पण महापुरुषांचा आधार कधीच घेतला नाही. काही बावळट तर खरेच विटंबना झाली कि नाही याची शहानिशा न करता स्वतःची अक्कल पाजळू लागले आहेत. त्यांनीही जरा डोके ठिकाणावर ठेवावे.
या घटनेच्या निमित्ताने काही भंपक पाकिटवाले, विस्थापितांना डीवचून देण्यासाठी माझ्याविरुद्ध मेसेज पाठवून बरळू लागले आहेत. विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी मी काय प्रयत्न केले हे सविस्तरपणे थोड्याच दिवसांतच मांडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *