
कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्याला पौराणिक धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक साहित्यिक परंपरा मोठी लाभली आहे गोदावरी नदीच्या काठी दंडकारण्यात अनेक साधु संत धार्मिक स्थळे मंदिरे असून काहिंचा जीर्णोद्धार झाला आहे
त्या पैकी तालुक्याच्या पश्चिम भागात गोदावरी नदीच्या काठी दंडकारण्यातील मंजूर येथील तीर्थ क्षेत्र श्री सिद्धेश्वर देवस्थान.या देवस्थानचा जिर्णोद्धार श्री महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांनी केला
तेरा(बारा) वर्षं तपश्चर्या करून महाशिवरात्री ला प्रवचने करून समाजाला मार्गदर्शन करून सद्वर्तनी बनण्यासाठी वाट दाखवली ती धार्मिक तेची.समाजाला सदमारग दाखविताना त्यांनी ग्रंथ लेखन केले आहे
सिन्नर तालुक्यातील वावि येथील शाहिर परसराम उत्तर पेशवाईतील राघोबादादा पेशवे यांच्या दरबारात कोपरगाव ची लावणी सादर करुनही बक्षीस नाकारणारा सुई दोरयाला आयुष्य मागून कलेवर जीवापाड प्रेम करणारा शाहिर परसराम यथार्थ वर्णन करून वाचकांच्या हदयाला हात घातला आहे शाहिर परसराम यांचे देवपूर येथील गुरू वाविचा परीसर जिवंतपणे शब्द बद्ध करून वाचकांसमोर प्रत्यक्ष चित्र ऊभे केले आहे
परशुरामाच्या बरोबरच असणारी गुरव चिंचोली येथील कलावंत बकुळा तिच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचे संघर्षमय धकाधकीचे शब्द बद्ध चित्रण करून वाचकांना पेशव्यांच्या काळात नेले आहे वाचनसंस्कृती टिकून राहण्यासाठी दिनचर्येत धार्मिकता टिकून राहण्यासाठी सदरचा ग्रंथ मोलाचा आहे
याशिवाय अजूनही काही ग्रंथ लेखन महाराजांनी केले आहे
श्री क्षेत्र मंजूर येथे शाहिर परसराम व बकुळा यांच्या समाधी असून सिद्धेश्वर देवस्थानचा परिसर परम पवित्र स्थान व निसर्ग रम्य असून प्रत्येक माणसाने भेट दिली पाहिजे असा आहे
गुरूपौर्णिमा निमित्ताने श्री संत शिवानंद गिरीजीमहाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील सुखी समाधानी जीवनासाठी शुभाशीर्वाद घेऊ यात.
