महाराष्ट्राचा पारंपरिक लंगोऱ्या हा खेळ खेळत मुलांनी लहानपणी च्या आठवणीना ऊजाळा दिला:- अनिरुद्ध काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
घरी जात असतांना मला काही मुलं आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक लंगोऱ्या खेळ खेळतांना दिसली त्यामध्ये माझा मुलगा स्पंदन देखील खेळत होता.त्यावेळी थोडं थांबून मी मुलांचा खेळ पाहता पाहता कधी माझ्या बालपणीच्या आठवणीत हरवून गेलो ते मला देखील कळले नाही.

आम्ही देखील लहानपणी लंगोऱ्या खेळायचो खूप मजा यायची आपणच पाडलेली लंगोरी पुन्हा आपणच रचून जिंकायचे असा हा खेळ खेळतांना मोठे झाल्यावर आयुष्याची लंगोरी रचावी लागेल हे त्यावेळी ठाऊक नव्हते मात्र आज आयुष्याची लंगोरी देखील यशस्वीपणे रचली असली तरी लहानपणी धोके पत्करून लंगोरी रचतांना जी मजा होती ती मजा आयुष्याची लंगोरी रचतांना नाही याची जाणीव झाली.खेळणाऱ्या मुलांच्या लंगोरी,लंगोरी या कल्लोळाने माझ्या बालपणातून मला बाहेर यावे लागले त्यावेळी रम्य ते बालपण असा मनाशी विचार करत घराजवळ कधी आलो ते समजलेच नाही मात्र घरी आलो तरी बराच वेळ बालपणाच्या माझ्या आठवणी मनातून जात नव्हत्या…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *