
कोपरगाव प्रतिनिधी:-
कदाचित आपल्या नाभिक समाजातील महाराष्ट्रातील पहिला उपक्रम असेल तो ही स्तुत असा हृदय स्पर्शी सोहळा (प्रा डॉ नरेंद्र महाले सरांचे वडील सलून व्यवसाय करीत होते त्यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा परिवाराने साजरा केला समाजातील गौरवनिय बाब )



सरकारी असो वा खाजगी असो नोकरी करणारा मनुष्य ज्या वेळी वयाच्या 58 व्या वर्षी असो किवा 60 व्यां वर्षी रिटायर्ड होतो त्या व्यक्तीचा सेवा निवृत्ती चा कार्यक्रम तो सेवा देत असलेले ऑफिस च्या माध्यमातून व स्वतःच्या परिवाराकडून हा साजरा केला जातो कारण 35 ते 40 वर्ष नोकरी करून ती व्यक्ती निवृत्त होते निवृत्ती नंतर पैसा मिळतो सरकारी नोकरी असेल तर चांगले पेन्शन मिळते खाजगी ( कुठलेही महामंडळ) असेल तर कमी पेन्शन मिळते . पुढील आयुष्य जगण्यासाठी सहारा मिळतो . परंतु आपला नाभिक बांधव जो आपला सलून व्यवसाय करतो जेव्हा आयुष्यभर आपला सलून चा व्यवसाय करत करत कधी आपला परिवार वाढतो, कधी मुलं लहानची मोठे होतात, कधी मुला मुलींच् शिक्षण होतं , कधी लग्न होतं असा या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत त्याची वयाची साठी केव्हा निघून जाते हे त्यालाच कळतं नाही परिवाराचं ओझे उचलत उचलत तो साठी केव्हा पार करतो हे त्याचं त्यालाच कळत नाही मुला मुलींचे लग्न होतात मुली सासरी जातात मुलं चांगली शिकली तर नोकरी ला लागतात किंवा प्रयत्न करूनही नोकरी नाही लागली तर वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळतात असेच कालचक्र या माझ्या नाभिक बांधव सलून व्यवसायिकाचे चालत असते


व्यवसायात चांगले लक्ष दिलं तर व्यवसायाची प्रगती होते निर्व्यसनी असला तर परिवाराची प्रगती होते , परिवार सुशिक्षित सुसंस्कारित व आध्यात्मिक याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा दिनांक 21/7/2021रोजी(विशेष म्हणजे आषाढी एकादशी चा दुसरा दिवस बारस,उपवास पारणे फेडणारा दिवस या शुभ दिवशी )या दिवसाचे औचित्य साधून भुसावळ येथे प्रा डॉ नरेंद्र महाले यांच्या आई व वडिलांचा ” कर्तव्य पूर्ती शुभारंभ सोहळा ” ज्याला आपण सेवा निवृत्ती म्हणतो कदाचित या सोहळ्या पासून आपल्या समाजात सलून व्यवसायिक करून राब राब राबनारा माझ्या बांधवाचा ज्याने संपूर्ण आयुष्य आपल्या परिवारासाठी झोकून दिले


त्याचा कमीत कमी आपल्या परिवाराने साठी नंतर वयाचा विचार करून त्यांचा सन्मान सोहळा साजरा करावा आजच्या सोहळ्याचा मी स्वतः साक्षीदार होतो उपस्थित सर्वांच्या डोळ्याला पाण्याची वाट मोकळी करून देणारा असा हा भावनिक सोहळा होता या सोहळ्याला जिल्ह्यातील मोजके व स्थानिक बहुतांश समाज बांधव नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला


या वेळी सरस्वती विद्या मंदिर यावल चे संस्थापक अध्यक्ष मा.रमाकांतदादा देशपांडे दादा , मुख्याध्यापक मा.जी डी कुलकर्णी सर ,मुख्याध्यापक श्री संजीवजी बोटे सर, श्री बी एल पाटील, नायब तहसिलदार, श्री यशवंत पाटील, रेल्वे कॉन्ट्रॅक्टर ,अ. भा.जिवा सेना जिल्हाध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे ,जिवा सेना कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जी जगताप सर,जिवा सेना जिल्हा कार्याध्यक्ष अनिल भाऊ चौधरी, जिवा सेना जिल्हा संघटक तथा निरीक्षक किरण भाऊ नांद्रे ,जिवा सेना समन्वय समिती जिल्हाप्रमुख किशोर भाऊ श्रीखंडे, किन्ही येथील समाजाला सामाजिक दातृत्व नेतृत्व लाभलेले व्यक्तिमत्व सचिन भाऊ (बंटी भाऊ ) सोनवणे ,जिवा सेना विभागीय अध्यक्ष उदय भाऊ सोनवणे, जीवा सेना भुसावळ शहर अध्यक्ष अनिल भाऊ टोगे ,जिवा सेना दुकानदार अध्यक्ष राहुल भाऊ वाघ , कार्याध्यक्ष विनोद भाऊ आंबेकर, तालुका उपाध्यक्ष भिकाभाऊ बानाईत , नाभिक संघाचे जेष्ठ भास्कर दादा.बानाइत , संजय भाऊ बोरसे , नाभिक संघ सचिव प्रशांत भाऊ बानाइत, देविदास दादा ठाकरे , बबलू भाऊ सोनवणे , बापू भाऊ निकम ,जिवा सेना महिला जिल्हा कार्या अध्यक्षा सौ संगीता ताई जगताप , सौ अनिता आंबेकर, सौ विजया निकम ,सौ मंगला ताई ठाकरे इ समाज बांधव मान्यवर उपस्थित होते कोरोना सदृश्य परिस्थितीच्या नियमांमुळे इच्छा असूनही जिल्ह्यातील व शहरातील पदाधिकारी मान्यवर समाजबांधव यांना बोलवू शकले नाही ही सरांची खंत होती तरी आपण सर्व जण समजदार आहात सरांना समजून घ्याल हीच प्रा नरेंद्र महाले सरांतर्फे विनंती…
