
कोपरगाव प्रतिनीधी:-
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र भर सुरु असलेल्या शिवसंपर्क अभियानाला कोपरगांव शहरात जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने सर्व शिवसैनिकांना मध्ये उत्साह वाढत आहे. काल कोपरगांव शहरातील दत्तनगर, बेट व कोर्ट रोड भागात शिवसेना महिला आघाडीच्या शितलताई चव्हाण, अक्षिता आमले, उपशहरप्रमुख विकास शर्मा, गगन हाडा, संघटक नितीन राऊत, सह संघटक वैभव गिते व सागर परदेशी यांनी आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जुने ज्येष्ठ शिवसैनिक एसटी कामगार सेनेचे मा.शहरप्रमुख मुन्ना आव्हाड, बाळासाहेब लकारे, विलास गिते व तरुण शिवसैनिकांशी संपर्क साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तसेच शिवसेनेचे संघटन या भागात अजून वाढवण्यासाठी जेष्ठ शिवसैनिकांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित तरूण शिवसैनिकांना संघटन वाढविण्यासाठी जेष्ठ शिवसैनिकांनी मार्गदर्शन केले.

तसेच पुन्हा शिवसेनेच्या कार्यासाठी प्रवाहात येण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही जेष्ठ शिवसैनिकांनी सांगितले.
शिवसंपर्क अभियानातून जुन्या शिवसैनिकांना संपर्क करत असल्याने मनोमन आनंद झाल्याचे मत जेष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केले. जुन्या शिवसैनिकांचे विचार ऐकून आजही पक्षाबद्दल असलेली तळमळ दिसून आली व त्यामुळे या अभियानातून ऊर्जा व स्फूर्ती मिळाली.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक विशाल झावरे यांनी केले व आभार अक्षिता आमले यांनी मानले.
या वेळी शिव वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख, शिव व्यापारी सेनेचे योगेश मोरे, उपशहरप्रमुख आकाश कानडे,संघटक बाळासाहेब साळुंके,वसीम शेख,गोविंद चव्हाण, दत्तात्रय गिते, गणेश सोनवणे, ऋषी पवार, ओंकार वाघमारे, रुपेश सालकर, हरिष आवारे, संतोष ढाकणे, दत्तात्रय सालकर, भावेश सोनवणे, राहूल आव्हाड, अभिजीत आव्हाड, चेतन मोरे, कमलेश लोखंडे, गौरव गुप्ता, दिपक वाघमारे, योगेश गिते, विशाल आव्हाड, सुनिल पांडे, आनंद आव्हाड, आकाश कर्डिले, पवन वाघ, रामचरण आव्हाड, कुणाल गिते, राहूल हाडा, संदीप हाडा, सोनू निरभवणे, प्रदिप घोडे, स्वप्निल निरभवणे, पारिजात सौंदणे, लोकेश हाडा, गौतम हाडा, बळीराम टेकाळे, ऋषिकेश थोरात, गणेश निरभवने, अक्षय दिवाणे, गौरव लोखंडे, गौतम निंदाणे, मुजम्मील शेख, सद्दाम शेख, साहिल पटेकर, समीर शेख, साहिल पठाण, चेतन हाडा, चेतन निंदाणे, प्रकाश लोंढे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
