
कोपरगाव प्रतिनिधी:- वावी येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव वश्री संत सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी सिन्नर तालुक्यातील सार्वजनिक पुण्यतिथी उत्सव वावी.ता.सिन्नर येथे होणार आहे तसेच दुग्धशर्करा योग म्हणजे वावीचे आपले ज्येष्ठ नेते श्री सखाराम बापू जाधव यांनी श्री संत सेना महाराज मंदिर उभारणीचा विडा उचलला आणि अवघ्या दिड महिन्यात भूमीपूजन ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा असे नियोजन करून श्री संत सेना महाराज मंदिर दिमाखात उभे राहिले यासाठी त्यांनी स्वतःची जागा मंदिरासाठी दिली व स्वखर्चाने मंदिर पूर्ण केले यासाठी ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांनी पायाभरणी पासून ते कलशारोहना पर्यंत खास लक्ष है दिले त्यांना वावी येथील सर्व नाभिक बांधवांनी व राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले व तालुकाभर फिरुन सर्वांना आमंत्रित केलेले आहे.काल श्री संत सेना महाराज मूर्तीची व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची भव्य मिरवणूक पार पडली तरी सर्व नाभिक बांधवांनी हेच निमंत्रण समजून कार्यक्रमास यावे उद्या शनिवार दि.४/९/२०२१ सकाळी ९ ते१० श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन १० ते १२ किर्तन केसरी ह.भ.प.पांडूरंग महाराज गिरी वावीकर यांचे हरी किर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसाद होईल महाप्रसादाचे नियोजन सर्व नाभिक समाज बांधवांनी केले आहे


तरी सर्व बंधू भगिनी यांनी ज्ञानामृत व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक उत्सव कमिटीच्या वतीने सखाराम बापू जाधव अंबादास कदम मधुकर वाघ अशोक तुपे रमेश बिडवे बाळासाहेब साळुंके संतोष कदम गणेश कदम विठ्ठल कलकत्ते किशोर कदम सुदर्शन कदम त्रंबकराज कदम ऋषिकेश बिडवे वाळीबा जाधव संदीप जाधव संतोष आवटे अरुण आवटे बबलू कलकत्ते एकनाथ पूर्वे रामभाऊ पूर्वे गोपीनाथ पूर्वे जितू पूर्वे सर्व वावी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
