के के वाघ कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यातर्फे माती परीक्षण प्रात्याक्षिक..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या प्रतिक्षा भाऊसाहेब देवकर यांच्यातर्फे पढेगाव (ता.कोपरगाव) येथील ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतात माती परीक्षण प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तसेच रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर ३ महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा व माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करण्याचा सल्ला उपस्थित शेतकरी बांधवाना दिला. याबरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण केले. मातीमध्ये असणारे घटक जमिनीचा सामू मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले. जमिनीची सुपीकता कशी वाढवावी व जमिनीमध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे व त्यासाठी काय उपाययोजना करावी या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न के के वाघ कृषी महाविद्यालयांतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम सुरू आहे. कृषी पदवीधर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करावे लागते. मात्र सध्या कोरोनामुळे कृषीचे विद्यार्थी आपल्या परिसरातच हा कार्यक्रम राबवत आहेत. या उपक्रमांतर्गत कृषिकन्या प्रतिक्षा भाऊसाहेब देवकर यांनी पढेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी विद्यार्थ्याना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशकुमार हाडोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार व प्रा. सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळी:-
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या प्रतिक्षा भाऊसाहेब देवकर यांच्यातर्फे पढेगाव (ता.कोपरगाव) येथील ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतात माती परीक्षण प्रात्याक्षिकाचे आयोजनानंतर टिपलेला क्षण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *