विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी, विकासाचा वेग वाढवणार:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत असतांना केलेल्या अथक प्रयत्नातून मतदार संघातील अनेक रस्त्यांना निधी मिळाला आहे. जागतिक कोरोना महामारीचे संकट असले तरी विकासाचा अनुशेष मोठा असल्यामुळे विकासाच्या बाबतीत थांबून चालणार नाही. त्यासाठी भविष्यात विकासाचा वेग वाढवणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे नाशिक जिल्हा हद्द-पोहेगाव बु.,डोऱ्हाळे,कनकुरी मार्गे शिर्डी या रस्त्यावरील डोऱ्हाळे चौफुली ते वैतागमाळ डीपी पोहेगाव या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या माध्यमातून मागील साडे चार वर्षात ग्रामीण भागात अनेक महत्वपूर्ण विकासकामे होवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू पात्र लाभार्थ्यांना मिळाला आहे. सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी आपल्या गटातील व गणातील विकासकामे पूर्ण करून जबाबदारी पूर्ण केली. कोपरगाव तालुक्याचा विकासाचा अनुशेष मोठा आहे याची मला जाणीव आहे सध्या संपूर्ण विश्व कोरोनाच्या महामारीच्या विरोधात लढत आहे. आपली परिस्थिती देखील वेगळी नाही. दुसऱ्या लाटेचा मुकाबला करून तीला परतावून लावत असतांनाच तिसऱ्या लाटेच संकट येणार असल्याचे आरोग्य विभाग सांगत असले तरी त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, राहुल रोहमारे, रोहिदास होन, राहुल जगधने, माताजी शारदानंदगीरीजी महाराज, शंकरराव चव्हाण, देवेन रोहमारे, विठ्ठलराव जावळे, नंदकिशोर औताडे, निवृत्ती औताडे, ज्ञानदेव औताडे, राजेंद्र पाचोरे, राजेद्र औताडे, सचिन मुजगुले, किसन पाडेकर, माधवराव शिंदे, विशाल रोहमारे, योगेश औताडे, गंगाधर खोमणे, वाल्मीक नवले, काकासाहेब शिंदे, सिद्धार्थ शिंदे, माधवराव औताडे, नरहरी रोहमारे, अभियंता उत्तमराव पवार, कॉन्ट्रॅक्टर वैभव घुले आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:-
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे डोऱ्हाळे चौफुली ते वैतागमाळ डीपी पोहेगाव या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी आमदार आशुतोष काळे समवेत मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *