आरक्षण वर्गीकरण पंधरवाड्या चे आयोजन:-अँड.नितीन पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने सत्य शोधक अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंती दरम्यान आरक्षण वर्गीकरण पंधरवाड्या चे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
अनुसूचित जाती मध्ये समाविष्ट असलेल्या 59 जातींना 13% आरक्षण देण्यात आलेले आहे मात्र अजूनही या जात समूहातील अनेक जातींना आरक्षणाचा लाभ योग्य रित्या मिळालेला नाही त्यामुळे या जात समूहातील आरक्षण लाभ वंचित जातींनी आर्थिक सामाजिक,शैक्षणिक लाभ मिळावा या उद्देशाने अनुसूचित जाती आरक्षणाचे लोक संख्येच्या प्रमाणात वर्गीकरण व्हावे अशी वेळोवेळी मागणी केली त्यासाठी समाजातील विविध सामाजिक संघटना व नेत्यांनी अर्ज विनंत्या,मोर्चे,आंदोलने पदयात्रा परिसंवाद आयोजित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला विविध राज्यात अशाच प्रकारे विविध राज्यात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण मागणी केली गेली मात्र त्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेली नुकताच सर्वोच्च न्यायालयाने राज्यांनी अनुसूचित आरक्षण वर्गीकरण करावे याला अनुकूलता दर्शवली मात्र अजूनही समाजातील अनेक घटकांपर्यंत या विषयाची जाणीव नसल्यामुळे शासन या विषयावर भूमिका घेताना गंभीर दिसून येत नाही
मागील वर्षी लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष मा प्रा रामचंद्र भरांडे सर यांनी पुढाकार घेऊन अनुसूचित जातीमधील अनेक लाभ वंचित जात समूहांना एकत्र करून आरक्षण वर्गीकरण समिती ची स्थापना केली मात्र साथीच्या आजारामुळे गावोगाव जाऊन या विषयावर चर्चा करता आली नाही मात्र आता सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी पासून जयंती म्हणजेच १८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत समाज बांधवांनी या विषयावर काम करणाऱ्या विविध समाज संघटना,नेते पदाधिकारी,नोकरदार, कामगार,मजूर व नागरिकांना तसेच या समूहातील वंचित घटकापर्यंत जाऊन अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण जन जागृती पंधरवाडा साजरा करावा असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *