
कोपरगाव प्रतिनिधी:-
शिंगणापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता तेथे कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी भेट दिली..!!

“आगामी काळात लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वय वर्षे ३ ते १० वयोगटातील बालकांच्या पालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे ज्यामुळे पालक आणि त्यांचे बालक सुरक्षित राहण्यास अधिक मदत होईल अशी विनंती विवेकभैय्या कोल्हे यांनी तेथील अधिकारी,डॉक्टर यांना केली आहे..!!”

या प्रसंगी शिंगणापूरचे सरपंच श्री.भीमाजी संवत्सरकर,सौ.पूनमताई तुळसकर,पोलीस पाटील सौ.सविताताई आढाव,श्री.दत्तात्रजी संवत्सरकर,श्री.रामदाजी संवत्सरकर,श्री.श्रीकांजी संवत्सरकर,श्री.संदिपजी कुर्हे,डॉ.कृष्णाजी पवार,
डॉ.खोत डॉ.बोरडे आरोग्य सहाय्यक श्री नारळे , धनवटे वंदना,लोखंडे वैशाली , सर्व आशा सेविका
आदी उपस्थित होते..!!
