
कोपरगाव प्रतिनीधी:-
नगरपरिषदेचे कोवीड सेंटर तात्काळ सुरु करा अशी मागणी आज देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमच्या सदस्यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची नगरपालिकेत भेट घेऊन निवेदन दिले.
या प्रसंगी मेडिकल हेल्प टीम चे दत्तात्रय कडू पाटील, आप्पासाहेब ढुस, अमजद इनामदार ,अनिस शेख. प्रशांत कराळे, ऋषीकेश संसारे, डाॅ संदीप कदम आदी उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना दत्तात्रय कडू पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांत देवळाली प्रवरा शहरात कोवीडचे रुग्ण पुन्हा आढळुन येत असल्याने नगरपरिषदेने ते सुरु करत असलेले १०० ॲाक्सीजन बेडचे कोवीड सेंटर तातडीने सुरु करुन रुग्णांची होणारी धावपळ व गैरसोय टाळावी.
दत्तात्रय कडुपाटील यांचे नेतृत्वाखालील देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या शिष्टमंडळाने देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना आज भेटुन दिलेल्या निवेदनात नगरपरिषदेचे कोवीड सेंटर तात्काळ सुरु करा या देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमच्या मागणी सोबत पुढे म्हंटले आहे की,
सहारा कोवीड सेंटरमध्ये मेडीकल हेल्प टीमचे आवाहनाला प्रतीसाद देत अनेक दानशूर व्यक्तींशी बेड, मेडीकल साहित्य, पंखे आदि दान केले होते. आता सहारा बंद झाल्याने हे सर्व साहित्य देवळाली प्रवरा नगरपरिषद सुरु करत असलेल्या मोफत कोवीड सेंटरला देण्यासाठी आज हेल्प टीमने मुख्याधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी संभाव्य तिसरी लाट तसेच गावातील सध्याचा संसर्ग पहाता नगरपरिषदेने ते सुरु करत असलेले कोवीड सेंटर तातडीने सुरु करण्याची मागणी केली. तसेच या सेंटरसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा मनोदय मेडीकल हेल्प टीमने बोलुन दाखवला. कोवीड सेंटरची तयारी पुर्ण होत आली असुन शासनाचे आदेश येताच ते सुरु करण्यात येईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. निदान विलगीकरण कक्ष तातडीने सुरु करावी अशीही आग्रही मागणी हेल्प टीमच्या वतीने करण्यात आली आहे.
देवळाली प्रवरा शहरात लसीकरण अंत्यत मंद गतीने होत असुन नागरिकांवर इतर गावांत जावुन लस घ्यावी लागत आहे. देवळाली प्रवरा शहराची लोकसंख्या विचारात घेता लसीचा जास्तीचा कोटा देवळाली प्रवरा शहरास मिळावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी , तहसीलदार तसेच तालुका आरोग्य अधिका-यांशी संपर्क करुन त्यांना शहरातील परिस्थिती समज़ुन सांगितली. त्यांनी लसीचा कोटा वाढवुन देत असल्याचे आश्वासीत केले. त्यासाठी देवळाली प्रवरा हेल्प टीम जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लवकरच आग्रही मागणीचे निवेदन देणार आहे.
गेले दोन अडीच महिने कोवीड रुग्णांना सर्वतोपरि मदत करणा-या देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमच्या मा आप्पासाहेब ढुस, अमजद इनामदार ,अनिस शेख. प्रशांत कराळे, ऋषीकेश संसारे, डाॅ संदीप कदम आदी सदस्याचा या शिष्टमंडळात समावेश होता.
