

कोपरगाव प्रतिनिधी:-
येथील हौशी उत्साहात सर्वत्र दिसणारा कवि प्रमोद येवले र म परिख हिंदी ग्रंथालय वाचनालय सांभाळून होमगार्ड भरती होवून कष्टाची कामे करताना श्रमपरिहार करताना कवितेत मन रमवणारे संवेदनशील मनास जोडणारा माणूस
ईंद्रधनू हा प्रमोद येवले लिखीत काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे सदरच्या काव्य संग्रहामधे अनेकविध विषयांवरील कविता असून प्रत्येक कवितेत कविची आत्मीयता तळमळ जाणवली आहे समाजातील भ्रष्टाचाराच्या विषवल्ली ने समाजजीवन दूषित केल्याची खंत व्यक्त केली आहे शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवाने आलेल्या अपप्रवृत्ती कविला व्यथित करतात तरीपण आशावादी पणे जगण्यासाठी ऊभारी घेऊन आपला ठसा निर्माण केला आहे.


अनेक कविता निराशावादी व्यक्तींना जगण्यासाठी ऊभारी देणारया आहेत ऊदास निराश न होता पुन्हा नव्याने जगण्यासाठी लढण्यासाठी प्रेरणा घेऊन ऊभे राहण्याची आशावादी भुमिका कविने मांडली आहे सर्व कविता वाचताना मन संवेदनेने भाराऊन जाते
कविच्या भावि लेखन प्रपंचास हार्दिक शुभेच्छा…
