प्रशासनाच्या कामकाजात प्रसारमाध्यमांची सद्भावनेतून साथ महत्वाची ठरते:- उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे…

कोपरगाव

तहसिल,पंचायत समिती आणि इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे रक्तातील घटत तपासणी शिबीराचे आयोजन…

कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघा आणि वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचा उपक्रम.!

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रशासनाच्या कामकाजात प्रसारमाध्यमांची सद्भावनेतून साथ महत्वाची असून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाचा सहभाग असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.
कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ आणि वृंदावन डायग्नोस्टिक सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील मुख्य प्रशासकीय कार्यालयातील तहसिल,पंचायत समितीआणि इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे रक्तातील घटत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मंचावर तहसिलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे (आव्हाड), ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ.संदिप मुरुमकर,निवासी नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.अरुण गव्हाणे, स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके आदि उपस्थित होते.

याप्रसंगी कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे म्हणाले, प्रशासनाच्या माध्यमातून अहोरात्र सेवा देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांची आरोग्य विषयी संवेदनशीलता दाखवून माणुसकीच्या सद्भावनेतून कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची रक्ततपासणी शिबीराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.अरुण गव्हाणे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कोविड काळात प्रशासनाने केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन तहसिलदार योगेश चंद्रे यांचे आभार मानले.याप्रसंगी सुत्रसंचलन करतांना जुन्या पिढीतील पत्रकारांचे योगदानाबद्दल गौरवपूर्ण उल्लेख प्रास्ताविकात समन्वयक सुशांत घोडके यांनी मांडला.

या प्रसंगी वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ.संदिप मुरुमकर यांनी प्रशासन आणि पत्रकार यांचे सामाजिक कार्यात वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
दिवंगत पत्रकार अशोक खांबेकर छायाचित्रकार रफिक रंगरेज रंगरेज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
शिबिराचे यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे,कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज,उपाध्यक्ष शैलेश शिंदे,सचिव संतोष जाधव,सोमनाथ सोनपसारे,मोबीन खान,लक्ष्मण वावरे,संतोष देशमुख,सिद्धार्थ मेहरखांब,बिपिन गायकवाड,रवींद्र जगताप,अनिल दीक्षित,हेमचंद्र भव्वर यांचे सह वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचे (In charge) राहुल कापडिया,आदित्य महाजन(Lab Technician), तुषार पोळ(Lab Technician),कुणाल पवार(Lab Technician), महेश सांगळे (Lab Technician) यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *