छत्रपतींचा आदेश सकल मराठा समाजासाठी अंतिम:- श्री.सुमित कोल्हे…

कोपरगाव

कोेपरगांव प्रतिनिधी:-
आखिल विश्वाचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वंशज हे सकल मराठा समाजासाठी सर्वोच्च स्थानी होते, आहे आणि कायम राहतील. मराठा समाज आरक्षण संदर्भात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (६ जुन) दुर्गदुर्गेश्वर रायगडावर केलेल्या घोषणेबाबत व त्यांच्या संपुर्ण नियोजनात सकल मराठा समाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील व प्रत्येक आंदोलनाला पाठींबा राहील, असे प्रतिपादन युवा नेते व संजीवनी फाऊंडेशनचे सचिव श्री सुमित कोल्हे यांनी केले.
शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कानाकोपÚयात षिवस्वराज्य दिन म्हणुन साजरा झाला. छत्रपतींच्या विचारांचे निस्सिम भक्त व पालन करणारे श्री सुमित कोल्हे यांनी रविवारी कोपरगांवातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मराठा आरक्षणावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी जाहिर केलेल्या भुमिकेबध्दल त्यांनी आपले विचार मांडले.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष श्री स्वप्नील निखाडे, माजी उपनगराध्यक्ष श्री योगेश बागुल, शिवसेनेचे श्री भरत मोरे, मनसेचे श्री गायकवाड, नगरसेवक श्री जनार्दन कदम, माजी उपनगराध्यक्ष श्री विजय वाजे, माजी नगरसेवक बाळासाहेब आढाव, श्री वैभव आढाव, राहुल राजुरकर, सुनिल साळुंके , व इतर मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळी:- शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याास अभिवादन करताना श्री.सुमित कोल्हे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *