जीवनात सफलता येण्यासाठी परमेश्वर हाच एकमेव मार्ग आहे:- मीराबाई मिरीकर…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
परमेश्वराच्या कृपेशिवाय माणसाचे जीवन सफल होत नाही त्यासाठी जीवनात सफलता येण्यासाठी परमेश्वर हाच एकमेव मार्ग आहे असे उदगार ह.भ.प. मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त आयोजित किर्तनातून व्यक्त केले.
ऋषिपंचमी निमित्त येथे गोदावरी काठावर महिलांची स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर शनी मंदिराच्या पटांगणात किर्तन आयोजित केले गेले. प.पूज्य रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने व स्व. नामदेवराव परजणे ( आण्णा ) यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ४० वर्षापासून सुरु आहे. ती परंपरा आजतागायत संवत्सर गांवाने जपली आहे असे सांगून मिराबाई पुढे म्हणाल्या, कोरोना महामारीचा काळ अतिशय भयानक होता, त्यामुळे कित्येकांच्या आयुष्याचा नाश झाला. जे शिल्लक आहे, ते त्यांच्या परमेश्वररुपी सेवेमुळे टिकून आहे. श्वास थांबला म्हणजे सर्व थांबते, जग हे श्वासावरच चालू आहे. पूर्वी ऋषी मुनी हजारो वर्षे जीवन जगत होते, त्यांच्या जीवनात शांती होती. परंतु आज माणसाच्या जीवनात शांती राहिली नाही. कुणी कुणाचा विचार करीत नाही. जो तो हातचा राखून वागत आहे. आज लोक पदासाठी मोठे होण्यासाठी एकमेकात भांडत आहेत.
आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, त्यांना व्यावहारिक ज्ञान द्या, सद्याचे युग हे मोबाईलचे आल्याने तरुण मुले मुली भरकटत चालले आहेत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी ह.भ.प. मीराबाई मिरीकर यांच्या हस्ते महंत राजधर बाबा ऊद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी महंत राजधर बाबा, राजेश परजणे पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. किर्तन सेवेच्या ठिकाणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, राजेश आबा परजणे, सरपंच सुलोचना ठेपले, उपसरपंच विवेक परजणे, कोसाकाचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संजीवनीचे माजी संचालक फकीर बोरनारे, बापूराव बारहाते, रामचंद्र कासार, ह.भ.प. भानुदास महाराज,
खंडू फेपाळे, लक्ष्मणराव परजणे, लक्ष्मणराव साबळे, भरत बोरनारे, सोमनाथ निरगुडे, दिनेश दिंडे, अनिल आचारी, अविनाश गायकवाड, बाळासाहेब दहे, सुभाष डरांगे, दत्तात्रय परजणे, ज्ञानेश्वर कासार, सुर्यभान परजणे, सुभाष लोखंडे, चंद्रकांत लोखंडे, हबीबभाई तांबोळी, अशोक कासार, सुभाष बिडवे, बाबासाहेब संत, उपस्थित होते. तदनंतर राजेश परजणे फौंडेशनचे कार्यकर्ते, जनता इंग्लिश स्कूल व नामदेवराव परजणे पाटील कॉलेजचे सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांना महाप्रसाद वाटपाचे काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *