अमूल्य:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
नामस्मरण करीत राहा … याचा अर्थ कामधंदे सोडून ‘ टाळ कुटा ‘ असा होत नाही … . जे नरहरी सोनारानं केलं .. ‘ देवा तुझा मी सोनार , तुझे नामाचा व्यवहार म्हणत व्यवसाय सोडला नाही … सावताने केला मळा … विठठल देखियला डोळा म्हणत … शांती शेवंती फुलली . प्रेम जाई जुई व्याली . ‘ असा अनुभव बहरलेल्या मळ्यात घेतला … आपलं कामच त्यांनी ईश्वराचंधाम केलं … आपण मंदिरात दुकान नेणारी कर्तृत्ववान माणसं … ! त्यांनी दुकानाचीही मंदिरे केली ! माणसं बागेत जातात , घरचाताप विसरायला , तर तिथ बसून किराणा यादी करतात . घरात बाग आणणं जमत नाही.बागेत घर नेतात .. खरंच जिथं तिथं आपल्याला मूल्य दिसतं नोटांमधलं … छन छन पैशामधलं . पण …
अ-मूल्य जाणवतच नाही .

सुलेखन – गोरे सर 9850613612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *