शेतकरी बांधवांसाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन पंतप्रधानांचा बळीराजाला दिलासा-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
संपूर्ण जगासह देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या एक वर्षभरापासून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान विस्कळीत झालेले असतांना शेतकरी बांधव देखील या दृष्टचक्रातून सुटलेले नाही.कोरोनामुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधव आधीच चिंताग्रस्त झालेले होते त्यातच रासायनिक खत निर्मिती करणा-या कंपन्यांकडून खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले होते मात्र देशाचे पंतप्रधान मा.ना.श्री नरेंद्रजी मोदी यांनी शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार करुन रासायनिक खतांच्या किंमतीवरील अनुदानात ऐतिहासिक वाढ करुन खतांच्या किंमती कमी केल्याची माहीती इफकोचे जनरल बॉडी प्रतिनिधी व शेतकरी सहकारी संघ कोपरगांव संचालक विवेक कोल्हे यांनी दिली आहे.

श्री कोल्हे पुढे म्हणाले की राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून मोठ्या तीव्रतेने वाढत असून त्याचा फटका शेतकरी बांधवांनाही बसलेला असून लॉकडाऊनमुळे पिकविलेल्या मालाची विक्री कशी करावी या विवंचनेत असतांना वारंवार बंद होत असलेल्या बाजार समित्यांमुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित पुर्णत: कोलमडले असून उत्पादन खर्चही कसा निघेल यामुळे शेतकरी चिंचातूर झालेले होते.त्यातच रासायनिक खतांची निर्मिती करणा-या विविध कंपन्याकडून खतांच्या किमंतीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे त्यात भर पडली होती मात्र देशाचे पंतप्रधान ना.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी रासायनिक खतांच्या अनुदानात 140 टक्के वाढ करुन शेतकरी बांधवांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मोठा दिलासा दिलेला आहे. डि.ए.पी मध्ये वापरल्या जाणा-या फॉस्फोरिक ऍसिड व अमोनिया यांच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खतांचे दर वाढले मात्र दरवाढीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना याचा निश्चितच लाभ होणार आहे.

केंद्र सरकाने डी.ए.पी खतांच्या अनुदानात प्रती बॅग रुपये 700/-ने वाढ करण्याचा निर्णय घेतला.इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर्स को-ऑपरेटीव्ह नवी दिल्ली या प्रमुख खत निर्मिती करणा-या कपंनीने रासायिक खतांच्या विविध ग्रेडच्या खतांच्या किंमतीमध्ये रुपये 100/- ते 700/- प्रती बॅग कपात करुन किंमती कमी केल्या असून आता एन.पी.के 10:26:26(50किलो)रुपये-1175/-, एन.पी.के.12:32:16(50किलो)-रुपये-1185/- एन.पी.के. 20:20:0:13 (50 किलो) रुपये-975/-, डी.ए.पी.18:46:0 (50 किलो) रुपये-1200/- अशा प्रकारचे दर दिनांक 20 मे 2021 पासून लागू केलेले आहेत तसेच युरीयाची कमतरता दूर व्हावी यासाठी इफकोने नॅनो युरिया (लिक्विड युरिया) 500 मि.ली.बॉटलमध्ये निर्मिती सुरु केलेली असून लवकरच शेतकरी बांधवांना उपलब्ध होणार असल्याची माहीती श्री कोल्हे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *