Uncategorized

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम येथे गुरुपौर्णिमा उत्सव देश-विदेशातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न…

गुरूपौर्णिमा उत्सवात देखील सत्संग आणि ध्यानाला महत्व दिले जाते:-संत परमानंद महाराज अध्यक्ष, आत्मा मालिक ध्यानयोग मिशन…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात आयोजित गुरू पौर्णिमा उत्सवात देश विदेशातील दिड लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. सामुहिक ध्यानधारण आणि संत पूजन हे या येथील उत्सवाचे वैशिष्ट असते. गूरूपौर्मिणेच्या पहाटे ओम गुरूदेव माऊलींचे पूजन संत परमानंद महाराज व संज निजानंद महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुप्रसिध्द प्रवचनकार कणकेश्वरी देवी उपस्थित होत्या. तेवीस ते एकोणतीस जुलै या कालावधीत आश्रमाच्या वतीने अखंड अन्नदानाचे आयोजन करण्यात आले.
यंदा गुरूपौर्णिमे निमीत्त मध्य प्रदेशातील संत कणकेश्वरी माता यांच्या गुरूगीता कथेवर आधारीत प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. त्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आत्मा मालिक शैक्षणीक संकुलातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी देखील या उत्सवात सहभाग घेतला. गुरूदक्षिणा म्हणून त्यांनी या उत्सवात भाजीपाला व धान्य भेट दिले. संत्सगासाठी सत्तर हजार स्केअरफुट आकाराचा मंडप उभारण्यात आला होता.

आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज उपाध्यक्ष निजानंद महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब , सचिव हनुमंतराव भोंगळे व विश्वस्त मंडळाने उत्सवाचे नियोजन केले. सातेशहून अधिक स्वयंसेवक भाविकांना विविध सेवा सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत होते.

केंद्रीय मंत्री कैलास विजय वर्गीय, जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनी विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, डाॅ.सुधिर तांबे, दुर्गा तांबे, आमदार मंजुळा गावित, संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी विद्यापिठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे आदिंनी उत्सवात सहभाग घेऊन ओम गुरूदेव माऊलींचे दर्शन घेतले.

——————चौकट—————-
परमानंद महाराज(अध्यक्ष, आत्मा मालिक ध्यानयोग मिशन) ः- ध्यान आणि मौनात मोठी शक्ती आहे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात ध्यानधारणेसाठी देश विदेशातील भाविक येतात. गुरूपौर्णिमा उत्सवात देखील सत्संग आणि ध्यानाला महत्व दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *