
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज जिथं आजी आजोबा आहेत तिथं त्यांच्या मनातल्या गोष्टी गळ्यात गुदमरल्यात … नातवंडं मायेनं येऊन आजोबांच्या कुशीत बसण्यापेक्षा टिव्हीत कार्टून बघणं पसंत करतात . मोबाईल … घेवून बसतात … नवनिर्मितीचे पंख बालपणाला फुटतच नाहीत . मला पंख असते तर … ” हा निबंध मुलं दीड ओळीत संपवतात … मुलं लिहितात … ‘ हा विषयच चुकीचा आहे : मला पंख असणं शक्यच नाही … गंमत तर हीच आहे … मेंदूनं चंद्र काबीज करणाऱ्या आजच्या पिढीला हृदयातील फुलं फुलतात हे कळतच नाही … काय हरवलंय तेच न कळणं- याहून दुसरी गरिबी कोणती ?
सुलेखन – गोरे सर-
9850613612
