
कोपरगाव प्रतिनिधी:-
यंदा वेळेवर पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे परंतु कोरोना महामारी व लॉककडाऊन मुळे यंदाचा खरीप हंगाम लांबण्याची शक्यता आहे.
मे महिना संपण्याच्या उंबरठ्यावर असून खरीपा साठी लागणारे लाखो मेट्रिक टन खत व बियाणे अजून कुलुप बंद आहे. शासकीय पातळीवर दुकाने सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाही. लसीकरणा प्रमाणे ऐन वेळी जून महिन्यात बियाणे व खतांसाठी कृषी सेवा केंद्रा बाहेर रांगा लावाव्या लागत तर नाही ना अशी शंका शेतकऱ्यांमध्ये उपस्थित केली जात आहे.
तरी शासनाने लॉकडाऊन मधून शेती क्षेत्राशी निगडीत दुकानांना सकाळी ७ ते संध्याकाळ ५ वाजेपर्यंत वेळ वाढून द्यावी, कारण ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन स्थानिक प्रशासनाने कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत, त्यामुळे इतर दुकाना प्रमाणे ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्र बंद आहेत खत व बियाणें चे जिल्ह्यात ठोक६०० विक्रेते आहेत, त्यांचा कडून लहान मोठ्या कृषी सेवा केंद्रांना खत व बियाणे पोहच होत असतात परंतु ठोक विक्रीत्यांचे दुकान सध्या बंद असल्याने बियाणे व खते छोटे दुकानदारांना पोहच झाले नाहीत.तसेच
अक्षय तृतीयाचा मुहर्तावर काही भागात कपाशी लागवडीला सुरुवात होते,ज्या भागात पाणी आहे अशा तालुक्यातील शेतकरी बियाण्यांची मागणी करत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन जातीचे बियाणे व खते वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. कोरोना मुळे दुकाने बंद असल्याने बियाणे व खते मिळत नाही, या बाबत शासनाने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खत व बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावे, ज्याने करून खरीप हंगामास विलंब होणार नाही.
तसेच केंद्र सरकारने रासायनीक खतावरील अनुदान कमी केल्यामुळे ७ एप्रिल पासून खताच्या किंमतीत ७००-९०० रू प्रतीबॅग महगल्या आहे, त्यामुळे शेतकरी खरीप हंगामापूर्वी हवालदिल झाला आहे. केंद्राने आज प्रसिध्दी केलेल्या पत्रकात फक्त DAP खतावरील अनुदान वाढवले आहे, बाकीच्या खतांचे जसे युरिया ,सुफला व इतर खतांचा उल्लेख आढळत नाही. तरी केंद्राने सर्व सरसगट खतांवर अनुदान वाढवावे.
सध्या बाजारात जुन्या दराचा लाखो मेट्रिक टन खताचा साठा गोडाऊन मध्ये शिल्लक असून या सर्व खतांचा खत विक्रेत्यांकडून काळा बाजार होण्याची दाट शक्यता आहे, जुन्या दराचा काळा बाजार शासनाने वेळीस रोखवा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते केंद्रीय कृषी मंत्री व राज्य कृषी मंत्री यांना घेरावा घालुनआंदोलन करण्यात येइल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार शरद खरात यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात दिला आहे.
कारण आधीच कोरोनामुळे २ वर्षांपासून शेती व्यवसाय डब घाईला आलेला आहे, त्यात शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. लॉकडाऊन मुळे शेतमाल शेतातच सडत आहे तरी शासनाने बियाण्यांचे व खतांचे दुकानास वाढीव वेळ देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मा.जिल्हाध्यक्ष व सल्लागार शरद खरात यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात केली आहे.
