

कोपरगावच्या संस्कृती पापड उद्योग समूहाच्या पापडाची नाशिक,नगर, मालेगाव,पुणे जिल्ह्यात वाढली मागणी…
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव येथील संस्कृती पापड उद्योग समूह होतोय, नगर नाशिक मालेगाव येथे प्रसिद्ध. कोपरगाव येथील पापड हा अंत्यत दर्जेदार व चवीष्ठ असुन कोपरगाव तालुक्यासह शेजारील जिल्ह्यात मागणी वाढत आहे.घरगुती पध्दतीने हे पापड केलेले असुन, चांगल्या दर्जेचे सामग्री वापरून हे पापड बनविण्यात आले आहे.सौ.कावेरी विशाल राऊत यांनी हे पापड बनविले असुन त्यांच्या पापडाला चांगली मागणी असुन नुकतेच कोपरगाव विधानसभेचे आमदार तथा श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी संस्कृती पापड उद्योग समुहाच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने लावलेले स्टाँलला आवर्जुन भेट दिली आहे.हळद, उडीद, मुग, नागली, डिस्को पापड, तांदुळाचे पापड, ज्वारीचे पापड, बाजरी खारुडी, वेफर्स तसेच शेवया व कुरडई असे इतर खाद्य पदार्थ देखील तयार करून दिले जातात.मोहनीराजनगर, नगर-मनमाड रोड, कोपरगांव या ठिकाणी असलेल्या संस्कृती पापड उद्योग समूहाचे पापडाला दिवसेदिवस मागणी वाढत आहे.संस्कृती पापड उद्योग समूहाच्या कावेरी विशाल राऊत यांच्या बरोबर त्यांचे पती विशाल राऊतही त्यांना व्यवसायात मदत करत आहे
