कोपरगाव शहरात प्रभाग क्र. १ (खडकी) येथे भूमिगत गटार, रस्ते व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी श्री. शांतारामजी गोसावी यांना निवेदन देण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात प्रभाग क्र. १ (खडकी) येथे भूमिगत गटार, रस्ते व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी श्री. शांतारामजी गोसावी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिलेदार, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सचिव रेखाताई जगताप, अश्विनीताई नरोडे, कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सौ. चंद्रभागाबाई हिंगे, सौ. भाग्यश्रीताई बोरुडे, उपाध्यक्ष सौ. राणीताई बोर्डे, कु. दिक्षाताई उनवणे, शीतलताई लोंढे, मीनाताई पगारे, बायजाबाई ठाकरे, कमलताई पवार, संगिताताई गांगुर्डे, नेहाताई बोर्डे, उषाताई झगडे, साक्षीताई झगडे, रुक्मिणीताई सुरासे, आशाबाई आरणे, अनिताताई माळी, शमीमताई खान, विजयाताई आरक, उज्वलाताई मोकळ, लक्ष्मीबाई ठाकरे, सुगंधाताई शिंदे, विमलताई मोकळ, नर्मदाताई झाल्टे, कांताबाई मेंघळ, सारिकाताई परदेशी, शकुंतलाताई मोरे, बेबीआपा पठाण, शीतलताई वायखिंडे, रुपालीताई कळसकर, पूनमताई पाटोळे आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *