साहेब… एक लोकहिताचे विद्यापीठ:- भरत मोरे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
तारीख २/२/२२ आणि आम्ही दोन शिवसैनिक अस्लमभाई शेख ,मी भरत मोरे संध्याकाळी माझ्या मेडीकल मध्ये नेहमीप्रमाणे भेटलो..आणि चर्चेत प्रमुख विषय निघाला कि कोल्हे साहेब उपचारासाठी मुळे हाॅस्पिटलमध्ये भरती झाले आहे….चर्चा होताच आमचे पाय आपोआपच मुळे हाॅस्पिटलकडे वळाले..,,कारण माझ्या लहानपणापासून साहेबांन बद्दल एक आदरयुक्त लोकहितासाठी त्यांचा असलेला शासन-प्रशासन दरबारी दबदबा ,..यासाठी साहेबांना कायम जवळून पाहण्याची उत्सुकता मनामध्ये असायची,..साहेब आजारी आहेत हे समजल्यावर तर अजून तिव्र ईच्छा साहेबांना पाहण्याची,भेटण्याची झाली…..
…१९८७ चा काळ,. रांझणातून पाण्यानं भरून आणलेल्या तांब्या-फुलपात्र्यातील पाणी.. ….कालेमळा येथे आम्ही रहायचो..समोर व्यापारी धर्मशाळेच्या पोटात काही दुकानं होती त्यापैकी वैजिनाथ न्हावी यांचेकडे कोल्हेसाहेब दाढी करण्यासाठी सफेद रंगाच्या ॲम्बेसेडर मधून यायचे आणि आमच्या भावांत आणि मित्रांत स्पर्धा सुरू व्हायची की कोण साहेबांना प्यायला पाणी घेवून जाणार,… कारण साहेबांना पाहण्यासाठी आम्ही कालेमळ्यातील चिल्लर पार्टी एकमेकांचे खांदे मागे ढकलत तांब्या-फुलपात्र हातात असणा-याच्या सोबत उभे राहून साहेबांना अगदी जवळून पाहायला मिळायचं,… साहेबांचा विस्वासाने तुडुंब भरलेला तो कडक आवाज ,‌…साहेबांचे ते मोठ्ठ्यानं हसणं,…दरारा ..,पण तितकंच ते जिव्हाळ्याने माझ्या वडीलांना मोरे सरकार म्हणत कुटूंबाची चौकशीही करायचे,…सोळा वर्षाच्या तरूणालाही लाजवेल अशी मिजास साहेबांची त्यावेळी असायची,… वडील सांगायचे की ,..एखादा अधिकारी लोकहितासाठी चुकला तर साहेबांच्या नजरेला न भिडता तो शिक्षा म्हणून झालेली चूक सुधारीत करून हिच आपली आपली माफी असं समजून पुन्हा लोकहिताच्या सेवेत जोमानं रूजू होत असायचा….ईतका तो साहेबांच्या बोलक्या नजरेतही दरारा होता,…वडीलांचे बोलणे संपूच नाही असं वाटयचं कारण कोपरगांवचा अभिमान आहे कोल्हे साहेब…. खरंच विचार जर केला तर असं स्पष्ट जाणवते हे दोन कारखाने कोळपेवाडी कारखाना आणि संजिवनी कारखाना हे कोपरगांव तालुक्याचे खंबीर बुरुजं आहे ज्याचे लढवय्ये योध्दे स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि मा.श्री शंकरराव कोल्हे साहेब आहेत ,.हे योध्दे तालुक्यातील रयतेला आणि पोशिंद्याला सोबत घेवून त्यांच्या हितासाठी अनेक राजकीय, नैसर्गिक लढाया जिंकत सर्व तालुका रयतेच्या संरक्षणासाठी असलेलं दोन बुरुजं आजपर्यंत अबाधित ठेवले ,..नाहीतर शहराचं वाळवंट नक्कीच झालं असतं,..यात तिळ मात्र शंका नाही.
राजकीय पटलावरच्या काही घडामोडी घडल्या आणि मी शिवसैनिक म्हणून कोल्हे साहेबांच्या कुटूंबासोबत काही काळ घडामोडींच्या राजकारणात कार्यकर्ता म्हणून काम करायला संधी मिळाली…., साहेबांना जवळून पाहण्याची संधी तर सोडा ओ ,..काही क्षणही घालवण्यासाठी नशीबाने आमंत्रण दिले,… साहेबांनी भर मिटींग मध्ये माझे आजोबा स्वर्गीय.मुरलीधरबाबा शिंदे ,.माझ्या आईचे वडील, राहणार पढेगाव ,..यांची आठवण काढत एक किस्सा सांगितला,‌…शिंदे बाबा मला भेटण्यासाठी बॅंग्लोरला ट्रक घेवून आले होते ,…अशी आमची मैत्री होती. आणि हे वाक्य एैकल्याने कौतुकाने माझी छाती फुगली…..त्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी झाल्या ,… त्यावेळी साहेबांचा खरा साक्षात्कार झाला,…साहेब एकदम निडर आणि संयमी आहे,…प्रेमळ आहे…आणि ख-या अर्थानं साहेब..एक लोकहिताचे विद्यापीठ हे उमजलं…..
अस्लमभाई आणि मी मुळे हाॅस्पिटलच्या लिफ्टने तिस-या माळ्यावर पोहचलो,..वरची गर्दी भेदून आत साहेबांच्या रूममध्ये पोहचलो,.. साहेबांचे दोन सेवेकरी शेजारच्या काॅटवर बसलेले होते,..आम्हांला पाहताच ते उठले आणि त्यातला एकजण साहेबांच्या कानाजवळ जात आमची ओळख सांगितली पण साहेबांनी त्या सेवेकरीला त्यांच्या स्टाईलने थांबवत मी दोघांना ओळखतो हे दोघे शिवसेनेचे आहे,……त्याच वेळेला टचकन मन भरून आलं आमचं ,..कारण अफाट कर्तृत्ववान, बुध्दीवंत, संघर्षशील या जेष्ठ नेतृत्वानं आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यालाही आजारपणात स्वउपचार घेत असताना ओळखावं हे आमच्यासाठी आम्ही नशीबवानच आहे,असं ठळकपणे वाटलं …..आई भवानीच्या कृपेने आमच्या तालुक्याच्या भाग्यविधात्याला लवकर बरं करावं आणि अजून ऊदंड आणि दिर्घायुष्य देवून पुन्हा साहेबांना लोकहीतासाठीच्या विद्यापीठात रूजू करावं हिच विनंती…..
शब्द.
भरत मोरे.
९५५२२२५५२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *