मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणास “खोडा” घालणारा शासन निर्णय रद्द करा:- राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील 33% आरक्षण महाराष्ट्र सरकारने रद्द केले असून तो ‘खोडा’ घालणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलप यांच्या आदेशानुसार आज तहसीलदार कार्यालयात नायब तहसिलदार श्रीमती कुलकर्णी यांना देण्यात आले.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत मोजक्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहत हे निवेदन दिले आहे महाराष्ट्रातील मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील 33% आरक्षण रद्द करणारा दि.07/05/2021 रोजीचा शासन निर्णय असवैधाणीक आणि बेकायदेशीर असल्याने मागासवर्गींयामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ‘तो’ शासन निर्णय तात्काळ रद्द करावा आणि मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका मधील अंतिम निर्णयाचे अधिन मागासवर्गीयांच्या कोट्यातील पदोन्नतीची 33%रिक्त पदे बिंदू नामावली नुसार भरावीत अशा सात मागण्याच्या निवेदनाच्या प्रती राज्यभरातून एकाच वेळी जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती,मा पंतप्रधान,मा मुख्यमंत्री साहेब, महामहिम राज्यपाल महोदय ,,उप मुख्यमंत्री,पालक मंत्री,खासदार मा.मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले

निवेदनावर उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीपराव कानडे,राज्यकार्यकारणी सदस्य एम डी कानडे, जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ दुशिंग ,जिल्हा सचिव संजय पोटे, जिल्हा उपाध्यक्ष देवीदास कानडे, युवा जिल्हा सचिव संजय सरवार ,तालुका अध्यक्ष माधवराव पोटे, युवा तालुका अध्यक्ष संतोष शिंदे ,सचिव सागर पोटे,कार्याध्यक्ष अँड रमेश दुशिंग ,शहराध्यक्ष गणेश कानडे ,संतोष दळवी ,संतोष कानडे ,संकेत कानडे यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *