प्रसाद सुभाष नाईक यांच्या रचना स्क्वेअर या शॉपिंग सेंटरचा शुभारंभ , पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा:- नारायणशेठ अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
पावशतकी वाटचालीत सर्वोत्तम निवासी व व्यावसायिक बांधकामातून जनमानसात अढळ स्थान प्राप्तकर्ते प्रसाद सुभाष नाईक यांच्या रचना स्क्वेअर या शॉपिंग सेंटरचा शुभारंभ झाला.
रचना स्क्वेअर ही केवळ माती विटांची इमारत नाही तर कोपरगाव शहराचा वैभव अधोरेखित करणारी वास्तू आहे. या जमिनीचे मूल मालक श्री सतीश शेठ पांडे हे कोपरगावातील प्रसिद्ध व्यापारी व मनमिळाऊ कार्यकर्ते श्री.प्रसादजी नाईक यांची कल्पक बुद्धी व त्यांना श्री.दिनार कुदळे व नगराध्यक्ष श्री.परागजी संधान यांची मनोभावे साथ आहे.व कोपरगाव शहरात प्रवेश करताना आशा भव्य दिव्य वास्तूमुळे कोपरगावकरांची व नगरपालिकेची मान उंच होते सहजच मनात येते “शोकेश मे इतना तो गोडाऊन मे कितना” म्हणजेच मध्ये कोपरगाव शहर किती सुंदर असेल त्याची कल्पना लोक करतात. आमचे युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी श्री प्रसादजी नाईक साहेब यांच्या विषयी जे गौरव उद्गार काढले यातच सर्व काही आहे.
कोपरगांव शहरात गत साठ वर्षांपूर्वी विविध प्रकारच्या शेती औजारांच्या दुरुस्ती व नव निर्मितीतून ग्रामीण भागातील जनतेत विश्वास हर्ता मिळविलेल्या. सुभाष नाईक यांचा या काळात विकसित राष्ट्रातून आलेली यंत्रे दुरुस्तीचा हात खंडा असल्याने नासिक, पुणे, आताच्या संभाजी नगर आणि अहिल्यानगर जिह्यातील बड्या बागाईतदारांचा त्यांच्या टपरीवजा गॅरेज मध्ये कायम राबता होता. .
या काळात सुभाषरावांनी व्यवसायातील त्यांचा सढळ हात , व माणसे सांभाळण्याचे लिलयेने अनेक कुटुबियांना आपलेसे केले. अल्पावधीतच आपल्या मित्रमंडळींच्या आग्रहास्तव बांधकाम व्यवसायात त्यांनी यश मिळविले.
या व्यवसायात त्यांनी कोणत्याही प्रकारचे बांधकाम हाती घेतल्यानंतर कधीच अनंत अडचणींवर मात करून दर्जेदार कामांची उभारणी केली. कोणतेही काम अर्धवट सोडून दिले नाही.
याच विश्वासार्हतेमुळे व्यवसायाचे भरभराटीत चिरंजीव प्रसाद यांनी कधी उडी घेतली हे कोणाला कळले नाही. आपल्या वडिलांच्या संस्कारित बावनकशी मुशीत तावूनसुलाखून निघालेल्या प्रसादाच्या यशस्वी कारकीर्दीचे सोने झाले . यामुळे अहिल्या नगर, नासिक, संभाजी नगर, पूणे जिह्यात बांधकाम क्षेत्रात प्रसाद लोकमान्य ठरला.
या दोघा पितापुत्र यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ग्राहकांचे तसेच विविध समाज संघटनांचे बांधकामात वेळप्रसंगी स्वतः झळ सोसली विविध समाज, व वैयक्तिक कामात
माणुसकी जोपासल्याने या परिसरातील समाज , धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रासह अनेक आपदग्रस्त, यांना वास्तु आणि दुकानदारांना अनेक पर्याय उपलबब्धकरुन देवून उभारी देण्यात हे कुटुंब कायम अग्रेसर राहिले.
अशा कर्तबगार व कोपरगांव तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व ब्राह्मण सभेचे नेते प्रसाद सुभाष नाईक व त्यांच्या कुटुंबीयांची अशीच प्रगती घडून त्यांच्या शुभ करकमलाने या परिसराची भरभराट होऊन सर्वोत्तम जनसेवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना !! —
शब्दांकन:- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव.
मो.9822630330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *