सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव कानडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव कानडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करून समाजापुढे चांगला आदर्श निर्माण केला
कोपरगाव येथील नगरपालिका शाळा क्रमांक सहा मधील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून अनावश्यक खर्च टाळून हा उपक्रम कानडे परिवाराने राबवत सामाजिक जबाबदारीची सर्वांनाच जाणीव करून दिली
या प्रसंगी बोलताना दिलीपराव कानडे यांनी सांगितले की माझे शिक्षण देखील याच नगरपालिका शाळेत झालेले असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विध्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींची मला जाणीव आहे बहुतांश विध्यार्थ्यांना अध्ययनात आवश्यक असणारे संपूर्ण शालेय साहित्य उपलब्ध नसते त्यामुळेच हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले
नगरसेवक मंदारजी पहाडे यांनी श्री कानडे यांना शुभेच्छा देत अनावश्यक खर्च टाळत कानडे परिवाराने हा उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला असल्याने या उपक्रमाचे कौतुक केले
या कार्यक्रमास दुय्यम निबंधक कुसाळकर साहेब नगरसेवक मंदारजी पहाडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्य कार्यकारणी सदस्या सौ स्नेहाताई कानडे,उद्योजक आकाशजी डागा शाळेच्या मुख्याध्यापिका एस. डी.साळुंके मॅडम, श्री माणिक कदमसर,सौ सोमासे मॅडम तसेच कैलास भारस्कर, संदेश कानडे, रोशन डागा ,संकेत कानडे,बबलू कानडे, रोहन कांबळे,उमेश बारसे,आदीसह विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *