

कोपरगाव प्रतिनिधी
(स्थानिक):- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील एनसीसी छात्रसैनिकांनी दिनांक १५ मार्च २०२६ रोजी अहिल्यानगर येथील आशिया खंडातील पहिल्या केव्हिलरी टॅंक म्युझियमला अभ्यासपूर्ण भेट दिली. सदरील टॅंक म्युझियम हे आर्मड कॉर्पस सेंटर अँड स्कूल यांच्या अंतर्गत स्थापलेले आहे.
टॅंक म्युझियम मधील अधिकाऱ्यांनी एनसीसी छात्र सैनिकांना तेथे असलेल्या विविध रणगाड्यांची माहिती सांगितली तसेच वेगवेगळ्या युद्धांमध्ये त्यांनी निभावलेली कामगिरी विस्तृत रित्या समजावून सांगितली तसेच स्वदेशी रणगाड्यांची माहिती दिली. रणगाड्यांचा सैन्य दलामध्ये होणारा उपयोग व त्याचे महत्त्व हे छात्रसैनिकांना सदरील भेटीमुळे अधिक प्रभावीपणे समजले. सदर उपक्रम भेटीला को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. मा. संजीव दादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. अहिल्यानगर येथील टॅंक म्युझियम भेटीच्या यशस्वीतेसाठी एनसीसी विभागातील एनसीसी अधिकारी कॅप्टन नितीन शिंदे व लेफ्टनंट वर्षा आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.
