


कोपरगाव प्रतिनिधी:-
जिलेबी गोड वळणांमध्ये साठलेल्या आठवणी…
जिलेबी म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही…
ती आहे आयुष्याच्या वळणांची गोड कहाणी.
एखादा क्षण असा उगवतो,
की तो दिवस साधा राहत नाही…
तो मनाच्या कप्प्यात अलगद घर करून बसतो.
एखादी व्यक्ती , एखादी प्रवृत्ती , एखादं दृश्य
मनावर कोरलं जातं…
आणि तिथून सुरू होतं चिंतन…
हळूहळू त्या चिंतनाला आकार येतो,
भावनांना शब्द सापडतात,
आणि शब्दांना एक ललित कलाकृतीचा चेहरा…
सेवानिवृत्तीनंतर मिळालेलं हे मनमुक्त आकाश,
मनात उठणाऱ्या तरंगांना मुक्तपणे व्यक्त होऊ देतं…
कोपरगावच्या इतिहासातून
अशाच काही गोष्टी समोर येतात..
ज्या केवळ पाहायच्या नसतात…
त्या जपायच्या आणि सांगायच्या असतात…
“ कानकुब्जी जिलेबी कॉर्नर परंपरेचा गोड वारसा”
आज अशाच एका क्षणी
कानकुब्जी जिलेबी कॉर्नर समोर थांबलो…
आणि मन थेट 1905 मध्ये जाऊन पोहोचलं…
साईबाबांच्या सहवासाचा तो काळ…
वैजनाथ प्रयाग कानकुब्जी यांनी सुरू केलेली ही परंपरा
आज पाचव्या पिढीतही तितक्याच अभिमानाने जिवंत आहे…
लक्ष्मीनारायण कानकुब्जी
आणि त्यांची पुढची पिढी धर्मलक्ष्मी , दीपक आणि आता पाचवी पिढी क्षीतिज सुद्धा
हे फक्त जिलेबी बनवत नाहीत,
ते जपतात विश्वासाचा आणि संस्कारांचा गोड वारसा…
“ जिलेबीचा आत्मा शुद्धता, प्रामाणिकपणा आणि चव”
ही जिलेबी फक्त गोड नाही..
ती मनाला स्पर्श करणारी आहे…
बिना रंग, बिना केमिकल
किती दिवस राहिली तरी न बदलणारी चव
आणि सर्वात महत्त्वाचं..
गरमागरम , ताज्या आठवणींसारखी चव… आज ही तीच
पोलादी कढई…
जुनं साधं दुकान…
आणि तितकीच मनापासूनची मागणी
एक रुपया किलोपासून सुरू झालेला हा प्रवास
आजही तितकाच गोड आहे…
“ गोडवा आणि आरोग्याची परंपरा
या परिवाराची ओळख फक्त जिलेबीपुरती मर्यादित नाही…
तर ती सेवेच्या गोड स्पर्शाने अधिक व्यापक आहे…
आजोबांच्या काळापासून
जंगली वनस्पतींवर आधारित
मुळव्याध (पाइल्स) साठी आयुर्वेदिक औषध देण्याची परंपरा..
आजही तितक्याच विश्वासाने सुरू आहे…
ही औषधी केवळ उपचार नाही..
ती आहे अनुभवाची शिदोरी…
अनेकांना याचा चांगला लाभ झाला आहे,
म्हणूनच दूरदूरवरून लोक
या विश्वासाच्या दारात येतात…
जिथे जिलेबी गोडवा देते,
तिथे ही औषधी..
आरोग्याचं समाधान देते…
“ जिलेबी जीवनाचा अर्थ…”
जिलेबीचं वळण जसं गुंतागुंतीचं,
तसंच आयुष्यही…
पण प्रत्येक वळणावर
जर गोडवा टिकवला
तरच जीवन सुंदर होतं…
जसं पु. ल. देशपांडे म्हणतात..
आनंद हा मोठ्या गोष्टीत नसतो ,
तो छोट्या क्षणांत सापडतो
आणि ही जिलेबी
त्या छोट्या आनंदांचं गोड प्रतीक आहे…
शेवटचा गोड विचार…
जिलेबी मागताना
ती कुणाला मागावी हे महत्त्वाचं…
कारण तिचा गोडवा फक्त साखरेत नसतो
तो मनाच्या नात्यांत असतो…
जिलेबी …
गोड, गोल… आणि आयुष्यभर आठवणीत राहणारी…
गोरे सर
कोपरगाव
