के.जे.सोमैया महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन समारंभ विविध उपक्रमांनी साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
स्थानिक : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे ध्वजारोहण मा. सुरेश शिंदे (सदस्य, कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, मा. राजेश जाधव मा. कांतिलाल वक्ते, प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, माजी एन.सी.सी अधिकारी कॅप्टन डॉ. एन. आर. दळवी, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. बी. बी. भोसले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एस. आर. पगारे हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात सर्व देशवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांनाच भारताची राज्यघटना ही भारताचा सर्वोच्च कायदा आहे. ही राज्यघटना कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असल्याचे सांगुन आपण सर्वांनी या संविधानाचे पालन करून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान दिले पाहिजे असे नमूद केले. ध्वजारोहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुरेश शिंदे यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या सर्वच वीरांना अभिवादन केले. भारतीय संविधानाची विस्तृत माहिती देतानांच विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासाबरोबरच राष्ट्रहितासाठी सदैव कटिबद्ध असावे, सामाजिक जाणिवेच्या भावनेतून सामाजिक साधनसंपत्तीचे रक्षण करने ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेना विभागातील अनेक छात्र सैनिकांना त्यांनी मिळविलेल्या नैपुण्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत व कलागुण सादर केले. प्रजासत्ताक दिनाच्या विविध उपक्रमांसाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे, राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ. नितिन शिंदे, लेफ्टनंट सौ. वर्षा आहेर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र बनसोडे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. सुनिल कुटे, प्रा. मिलिंद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *