
कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहरातील रूग्णांच्या सोयीसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या सहकायनि जिजामाता उद्यान येथे बुधवारी मोफत नेत्रतपासणी मोतीबिंदु शस्त्रकिया व सर्वरोग तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले त्याचे उद्घाटन वैभव आढाव व गोपीनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यांत आले.
प्रारंभी डॉ. योगेश बत्रा यांनी प्रास्तविकात आरोग्य शिबीराविषयी माहिती दिली. भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
श्री. वैभव आढाव याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतुन २०११ पासुन मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदु शस्त्रकिया व सर्वरोगनिदान शिबीर भरविण्यांत येतात यातुन हजारो रूग्णांना नव्याने दृष्टी मिळाली तर अनेकांच्या गंभीर आजारावर मोफत उपचार करण्यांत आले. सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगांव शहरातील सर्व प्रभागात हा उपक्रम राबविण्यांत आला. मानवतेच्या भावनेतुन संजीवनी उद्योग समुह आणि विवेकभैय्या कोल्हे यांनी रूग्णसेवेचा सुरू केलेला यज्ञ अव्यहतपणे चालू आहे. कोपरगांव शहरवासियांच्या प्रत्येक संकटात संजीवनीच सर्वप्रथम धावुन येवुन मदत करते. त्यांच्या सामाजिक सेवेचे योगदान विसरणे अशक्य आहे. याप्रसंगी सर्वश्री. सुधाकर क्षिरसागर, संजय ठाकुर, चंद्रकांत वाघमारे, सचिन सावंत, संजय वाघमारे, प्रकाश वाघ, किरण सुपेकर, सोपान चिखले, सतिष खडांगळे, सुदाम लकारे, शाम मापारी, अहमदभाई बेकरीवाले, किशोर कदम, सगुना वाघमारे, मंदाबाई ठाकुर, सुरेखा मापारी, बंटी पांडे, उध्दव विसपुते यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका मोठया संख्येने उपस्थित होते. या शिबीरात तपासणी झालेल्या रूग्णांना मोफत औषधे वाटण्यांत आली. तर हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, मेंदु, हाडे, व दातांचे आजार, नेत्रतपासणी, ईसीजी, एंजोग्राफी, तपासणी करण्यात आली.
