
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात कोपरगाव मतदारसंघाला दिलासा मिळण्याचे काम संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून सुरू आहे.या स्तुत्य आणि नियोजनबद्ध सुविधा देणाऱ्या संजीवनी कोविड सेंटरच्या सेवायज्ञात आपलेही योगदान द्यावे म्हणून कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनी यांनी कोविड सेंटरच्या परिसरात स्वच्छता मोहीम,रुग्णांना जेवण वाढणे,स्वयंपाक घरात मदतकार्य आदी प्रकारचे श्रमदान स्वयंस्फूर्तीने केले आहे.

सर्वत्र कोरोनाचे संकट मोठे झाले आहे यात पुढाकार घेऊन कोल्हे कुटूंबाने नेहमी प्रत्येक संकटात जी तत्परता असते त्याच आत्मीयतेने तातडीने कोविड सेंटर उभारून सर्वांना धीर दिला आहे.आमच्या सर्वांच्या आजच्या श्रमदानात आम्ही रुग्णांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर सर्वांनी विवेकभैय्या कोल्हे हे स्वतः रोज या सेंटरला सुविधांचा आढावा घेतात,रुग्णांची काळजी कुटूंबाप्रमाने घेतात हे आमच्यासाठी फार मोलाचे आहे असे रुग्ण म्हणाले असल्याची प्रतिक्रिया दिव्यांग भगिनी सौ.सुवर्णाताई गोळेचा यांनी दिली.


कोरोना हा संसर्गजन्य आजार असून मोठ्या प्रमाणात या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे.अनेक कोविड सेंटर सर्वत्र उभारले जातात पण गैरसोयी अभावी नागरिक तिथे जाण्याचे टाळतात मात्र संजीवनी कोविड सेंटरला अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी जातात त्यांची भावना अतिशय सुखद होताना दिसते आहे.संजीवनी कोविड सेंटरला कौटुंबिक वातावरण असल्याचे आणि अतिशय जिव्हाळ्याने जपले जाते असे रुग्ण आमच्याशी संवाद साधताना म्हणाले अशी प्रतिक्रिया मुकुंद मामा काळे यांनी दिली आहे.
मा.आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे,संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी या संकटजन्य परिस्थितीत आमच्या दिव्यांगानांही मोठा आधार दिला असून या कोविड सेंटरला आमचे अनेक बांधव उपचार घेण्यासाठी येतात त्यांना आपल्या कुटूंबातच आल्यासारखे वाटते असे दिव्यांग बांधव स्वप्नील कडू म्हणाले.
या प्रसंगी जयवंत मरसाळे,मुक्तार पठाण,संदीप शहाणे,धरम गोळेचा,दिनेश हिंगमिरे,दिनेश बोरणारे,राजेंद्र तासकर आदी उपस्थित होते.
