शासकिय चित्रकला परीक्षेत गौतम पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के, कोळपेवाडी केंद्रात गौतम पब्लिक स्कूल प्रथम….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :– सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शासकिय चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इलेमेंटरी चित्रकला परीक्षेत शाळेतील एकूण ६९ विद्यार्थी व इंटरमीजीएट परीक्षेस १०० विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेत एकूण १६९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. शाळेचा इलेमेंटरी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेत १९ विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर २४ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे. इंटरमीजीएट परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेत ४४ विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर ३१ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
शासकिय चित्रकला परीक्षेत कोळपेवाडी केंद्रातून व तालुक्यातून गौतम पब्लिक स्कूलने सर्व शाळांच्या तुलनेत सर्वोच्च निकालाची पंरपरा राखलेली आहे. सध्याच्या युगात करिअर करण्याच्या सर्वाधीक संधी कला क्षेत्रात उपलब्ध आहेत. कला क्षेत्राचा अर्थ चित्रकारीता, गायन, नृत्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात कलाकारांसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत आणि या सर्व कला प्रकारामध्ये गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहे.संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देवून यशस्वी विद्यार्थी घडवीण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग राबविले जाता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकाचे संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड,विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, संस्थेचे निरीक्षक नारायण बारे व सर्व संस्था सदस्य आदींनी अभिनंदन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण, माध्यमिक सुपरवायझर ज्योती शेलार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *