
कोपरगाव प्रतिनिधी:-
रेमडीसीविरचा पुरवठा मार्यदित आहे. गरजे पेक्षा ते जास्त घेतले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. कोरोना बधितावर उपचार करताना रेमडेसीविर इंजेक्शन हेच सर्व काही आहे, हा समज अत्यंत चुकीचा आहे, संजीवनी कोरोना केयर सेंटर व कर्मवीर शंकररावजी काळे कोरोना केयर सेंटर या ठिकाणाहून रोज इंजेक्शन शिवाय ५० ते ६० हुन अधिक रुग्ण पूर्णतः बरे होऊन बाहेर पडत आहेत. हे इंजेक्शन योग्य वेळी व त्याच्या नियमानुसार वापरावे.
रेमडेसीविर परिमाणकारकता त्याचा वापर योग्यवेळी व योग्य प्रमाणात झाला तरच काही ठराविक कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिसून येतो. त्याचा वापर केवळ काही प्रमाणात ‘व्हायरल इन्फेक्शन’ कमी करण्यासाठी होतो. अनावश्यक वापर लिव्हर, किडनीवर घातक परिणाम करणारा आहे. तसेच रुग्णाची शुगर पातळी ही वाढत आहे. त्यामुळे रुग्णाची आरोग्य परिस्थिती पाहून व या इंजेक्शन वापराचे नियम पाळून ते गरजेनुसार दिले गेले पाहिजे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम पाहण्यास मिळू शकतात अशी भीती वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.
रेमडेसीविरच्या ऐवजी स्टिरॉइड इंजेक्शन देकसामीतेसोड व ब्लड थिनर इंजेक्शनचा वापर केल्याने कोरोनावर प्रभावशाली व कोणतेही साइड इफेक्ट जाणवत नाही. हा खूप स्वस्तातला उपाय ठरत आहे असे डॉ संजीव कुमार, हृदयरोग विशेषतज्ञा हैदराबाद यांनी आपल्या विडिओ मध्ये म्हंटले आहे. तरी आपल्या येथील संजीवनी कोविड केयर सेंटर व कर्मवीर शंकरराव काळे कोविड केयर सेंटर येथील डॉक्टरांनी या इंजेक्शनचा वापर करण्यास काय हरकत आहे.
कोणी रेमडेसीविर देत असेल तर सावध रहा समाजमाध्यमांवर नामांकित उत्पादक कंपनीच्या नावाने गरजू व्यक्तींना रेमडेसीविर मिळून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्याचे प्रकार सोमोर आले आहे. नियमानुसार कुठल्याही उत्पादक कंपनी थेट ग्राहकांना या औषधाचा पुरवठा पुरु शकत नाही, त्यामुळे अशा कॉल, जाहिरातीपासून सावध रहा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे मा.जिल्हाध्यक्ष व सल्लागार शरद खरात यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रका द्वारे केले आहे
