डॉ. रामदास आव्हाड यांचा पंजाब आयुर्वेद प्रचार-प्रसार दौरा पूर्ण…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:<
नुकतेच पंजाब आयुर्वेद संमेलन व नस्य फौंडेशन तर्फे भटिंडा पंजाब या याठिकाणी रक्तमोक्षण व उत्तर बस्ती यावर राष्ट्रीय परिसंवाद व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .त्याठिकाणी भारतभरातून उपस्थित राहिलेल्या आयुर्वेद डॉ साठी कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य राष्ट्रीय आयुर्वेद गुरु वैद्य रामदास आव्हाड यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते .डॉ आव्हाड यांचे पूर्ण दिवस रक्तमोक्षण वर प्रत्यक्ष ट्रेनिंग व व्याख्यान सम्पन्न झाले .उपस्थित 750 डॉ च्या प्रश्नाचे समाधानही त्यांनी केले .त्यानंतर तेथील पंजाब आयुर्वेद संमेलन कार्यकारिणी समवेत पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन पर चर्चा सत्र केले .सहारा आयुर्वेद कॉलेज येथे डॉ रामदास आव्हाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला .मोगा याठिकाणी विद्यार्थी डॉ पंकज कटारिया यांचे आयुर्वेद रुग्णालयाचे उदघाटन करून बियास येथील राधा स्वामी डेऱ्यास डॉ आव्हाड यांनी भेट दिली .तेथील सत्संग नंतर जगविख्यात गुरु गुरजिंदर ढिल्लो साब यांचे वैयक्तिक दर्शन व चर्चेचे भाग्य त्यांना लाभले .राधास्वामी येथे येणाऱ्या लाखो भक्तासाठी तेथे मोफत आयुर्वेद चिकित्सालय सुरु करण्यासंबंधी चर्चा होऊन लगेचच त्याला मूर्त स्वरूप देण्यात आले ..अमृतसर येथे आयुर्वेद वैद्य वर्गाशी चर्चा व मार्गदर्शनही आयोजित करण्यात आले होते ..डॉ रामदास आव्हाड यांचे या तीन दिवसीय आयुर्वेद प्रचार प्रसार दौऱ्यामुळे पंजाब मधील वैद्यवर्गात उत्साह दिसून आला .लवकरच तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन लुधियाना येथे करण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *