मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा ; मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन…

Uncategorized

अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू:- मंत्री छगन भुजबळ…
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ व मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधूने, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, समाधान जेजुरकर, योगेश निसाळ, संजय खैरनार, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, कविता कर्डक, पूजा आहेर, आशा भंदुरे, किशोरी खैरनार, सुरेखा निमसे, नागेश गवळी, मकरंद सोमवंशी, नितीन चंद्रमोरे, अमोल नाईक, शंकर मोकळ, नाना पवार, सागर मोटकरी, मुख्तार शेख, श्रीराम मंडळ, प्रसाद सोनवणे, पपू शिंदे, श्रीराम मंडळ, भालचंद्र भुजबळ, ऍड.चिन्मय गाढे, रामेश्वर साबळे, संतोष पुंड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी १८८० साली रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली, त्या ठिकाणी साफसफाई करून मोठ्या आदराने त्या समाधीवर फुले वाहिली. तसेच शिवरायांवर पहिला पोवाडा लिहून शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. पुढे शिवजयंती साजरी करण्याची कल्पना देखील त्यांनीच मांडली आणि त्यासाठी वर्गणी देखील जमविली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या रयतेच्या या राजाचा त्यांनी 'कुळवाडीभूषण' असा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *