
आयआयटी, एनआयटी व आयआयएमच्या तज्ञांची नेमणुक..!!
कोपरगांव प्रतिनिधी:-
मागील अनेक वर्षांपासून ऊद्योग आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था व एमबीए यांच्यातील अपुऱ्या समन्वयामुळे ऊद्योग जगताला व सरकारी/ निमसरकारी आस्थापनांना अभिप्रेत असणारे मनुष्यबळ मिळत नाही. हा दुरावा दुर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत अभ्यासक्रम तयार करून तो विध्यार्थ्यांना शिकविण्या करीता संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एमबीएने शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासुन शैक्षणिक स्वायत्त (अकॅडमिक ऑटोनॉमस ) संस्थेचा दर्जा प्राप्त केला आहे. आता जागतिक पातळीच्या दर्जाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी संजीवनी एमबीए व इंजिनिअरींगच्या अभ्यास मंडळावर आयआयएम,आयआयटी व एनआयटी मधिल अधिकच्या तज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पुढे सांगीतले की संजीवनी एमबीएने अभ्यासक्रम मंडळावर आयआयएम (इंडियन इन्स्टिट्याुट आॅफ मॅनेजमेंट), बेंगलोरचे डाॅ. सुशांत मिश्रा व आयआयएम, अहमदाबाद मधिल डाॅ. शांतंम शुक्ला यांची नियुक्ती केली आहे. तर संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने अभ्यासक्रम मंडळावर पुढील प्रमाणे अधिकच्या तज्ञांची नेमणुक केली आहे. सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आयआयटी), दिल्ली चे डाॅ. वसंत मतसागर व नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी), सुरतचे डाॅ. के.डी. यादव, एनआयटी, सुरतचे अप्लाईड मेकॅनिक्स विभागाचे डाॅ. बी. कोन्ड्राईवेंधन, एनआयटी, सुरतचे काॅम्प्युटर इंजिनिअरींगचे डाॅ. के. चंद्रशेखरन, विश्वेश्वरय्या एनआयटी, नागपुरचे मेकॅट्राॅनिक्स विभागाचे डाॅ. अंकुर मिगलानी, याच संस्थेतील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे डाॅ. एस.एस. चिद्दरवार, आयआयटी, रूरकीचे डाॅ. गणेश कुंभार व एनआयटी, गोवा यंथिल प्रा.चार्ग मोदी यांचा समावेश आहे.
संजीवनी मधिल विध्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच पदवी मिळणार आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री. शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एमबीएने शैक्षणिक स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त करून व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात एक क्रांतीकारी पाऊल टाकले आहे.
शैक्षणिक स्वायत्त दर्जा प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालये फक्त मोठ्या शहरात आहेत. महाराष्ट्र राज्यात ग्रामिण भागात यापुर्वी फक्त एकच शैक्षणिक स्वायत्त संस्था होती. आता संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ही दुसरी शैक्षणिक स्वायत्त संस्था आहे. उत्तर महाराष्ट्रात विशेषतः अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक , जळगांव, धुळे या जिल्ह्यांमधून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एमबीए ही एकमेव शैक्षणिक स्वायत्त संस्था आहे. विध्यार्थ्यांना भविष्यात नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान समावेशक अभ्यासक्रम शिकविणे व काळानुरूप तो अपडेट करणे हा मुख्य गाभा आहे. अभ्यासक्रम मंडळावर यापुर्वीच इंडस्ट्री मधिल तज्ञ व माजी विध्यार्त्यांचाही समवेश करण्यात आला आहे, असे श्री कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
