आत्मा मालिक ने शैक्षणिक क्षेत्रात राज्यात ठसा उमटवला – नंदकुमार सुर्यवंशी….

“ज्ञानसाधना गौरव” पुरस्काराने आत्मा चे शिक्षक सन्मानित…
कोपरगाव प्रतिनिधी:- समर्पण भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणा-या शिक्षकांमुळे आत्मा मालिक शैक्षणीक संकुलाने राज्यात आपला ठसा उमटविला. कला क्रिडा, संगीत, नृत्य अभिनय, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रवेश आणि शालेय परिक्षेत आत्मा मालिक राज्यात वैशिष्टपूर्ण कामगीरी करते. त्यामागे या गुणी शिक्षकाचे टिमवर्क चे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले.
संस्थेच्या वतीने वैशिष्टपूर्ण कामगीरी करणा-या ७४ गुणी शिक्षकांचा ज्ञानसाधना गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, खजिनदार विठ्ठल होन, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, प्राचार्य निरंजन डांगे आदि यावेळी उपस्थित होते.
सुर्यवंशी म्हणाले, या शैक्षणीक संकुलातील एन. एम. एम. एस. परीक्षा , शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, आॅलंपियाड परीक्षा यामध्ये राज्यस्तरावर सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले.ही गौरवाची बाब आहे. शिक्षकांची मेहनत, विद्यार्थ्यांची शिस्त, ध्यान आणि आत्मचिंतन यामुळे हे यश मिळते.
——————-चौकट—————-
नंदकुमार सुर्यंवशी(अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट) ः- आत्मा मालिक पॅटर्न हे यश राज्यातील शैक्षणीक विश्वात नेहमी चर्चिले जाते. त्यात ज्ञानदान करणारे शिक्षक व ते ग्रहण करून यशासाठी परिश्रम घेणारे विद्यार्थी याचा महत्वाचा वाटा असतो. त्याच बरोबर येथील शैक्षणीक आणि अध्यात्मिक वातावरण विद्यार्थ्यांना प्रेरणा देते हे देखील महत्वाचे आहे.
