संजीवनी कोविड केअर सेंटर येथे वंचित बहुजन आघाडीने केला अनोखा उपक्रम:- शरद खरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी कोविड केअर सेंटर येथे कोपरगाव शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अन्नदान करण्यात आले.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अतिशय रम्य वातावरण,स्वच्छता आणि रुग्णांना देण्यात येणाऱ्या उच्च दर्जाच्या सोयी सुविधा यांचा मिलाफ असणारे संजीवनी कोविड केअर सेंटर हे रुग्णांना आजारावर मात करण्यासाठी मानसिक तंदुरुस्ती देखील महत्वाची असते,त्या दृष्टीने संजीवनी समूहाने उभारलेले हे कोविड सेंटर हे तालुक्यात आदर्शवत काम करत आहे.
इथे रुग्ण म्हणून नाही तर एखाद्या कुटूंबा प्रमाणे वातावरण निर्माण केलेले आहे याबद्दल सर्व स्टाफ,येथील आरोग्य सेवक यांचे काम कौतुकास्पद आहे.संजीवनी कोविड केअर सेंटर हे रुग्णांसाठी आनंदघर बनले आहे अशी प्रतिक्रिया वंचित आघाडीचे मा.जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सल्लागार श्री.शरद खरात यांनी दिली.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना जेवण व फळे आणि पाणी बॉटल यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बबलू जावळे उपजिल्हाध्यक्ष,अनिल बनसोडे जिल्हा कार्यध्यक्ष,रणजित खरात तालुकाध्यक्ष,पै.साईनाथ जाधव युवा तालुका अध्यक्ष,मेजर रविंद्र अहिरे ता.महासचिव,संजय कोपरे उपशहर अध्यक्ष, सुरेश त्रिभुवन,सामाजिक कार्यकर्ते निसारभाई शेख,राकेश गायकवाड,ऋषिकेश जगताप,सचिन बागुल,जितेंद्र गोर्डे,रोशन जराड,सिद्धेश खरात,निलेश खरात,राजू रोकडे,सचिन धुळे आदीं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *