कणखर पाठीचा कणा, निरोगी जीवनाचा पायाडॉ. प्रसाद उंबरकर यांचे जनजागृतीसाठी मोलाचे योगदान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे मेंदू व एंडोस्कोपिक स्पाईन सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर यांनी ” वर्ल्ड स्पाईन डे ” निमित्त दिलेला जनजागृती संदेश समाजाला खऱ्या अर्थाने जागवणारा ठरला आहे.
कणखर पाठीचा कणा, निरोगी जीवनाचा पाया” या विचारातून त्यांनी सामान्य जनतेसमोर आरोग्याचे एक सुंदर भान उभे केले आहे.

दररोजच्या धकाधकीच्या जीवनात, मोबाईलचा अतिवापर, बसून काम करण्याची सवय, शारीरिक हालचालीचा अभाव या सर्व गोष्टींमुळे वाढणाऱ्या पाठीच्या आजारांविषयी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत जागृती केली. डॉ. उंबरकर यांनी सांगितले की — “ पाठीचा कणा हा शरीराचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्याची योग्य काळजी घेणे म्हणजे आपल्या संपूर्ण आरोग्याचे रक्षण होय.”
त्यांनी लोकांना दिलेले मार्गदर्शन …

काम करताना योग्य पोस्चर ठेवा,
सतत बसून न राहता वेळोवेळी उठा,

वजनावर नियंत्रण ठेवा,
चालणे व व्यायामाला प्राधान्य द्या,
पोषक आहार घ्या ….
ही सोपी परंतु अत्यंत प्रभावी सूत्रे प्रत्येकासाठी अनुकरणीय ठरावीत अशी आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीद्वारे कमी वेदनादायी आणि यशस्वी उपचार उपलब्ध करून देणारे डॉ. उंबरकर यांनी मेंदू व मणक्याच्या हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. केवळ कुशल डॉक्टर नाहीत, तर खऱ्या अर्थाने जनसेवक आहेत.
रुग्णांप्रती असलेली त्यांची आत्मीयता, तांत्रिक ज्ञान आणि मानवतेने ओतप्रोत असलेले व्यक्तिमत्त्व हे वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

“आपला कणा – आपली ताकद” हा त्यांचा संदेश केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर जिवनाचा पाया कणखर ठेवण्याच्या मूल्यांसाठीही मोलाचा ठरतो.
मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक कौतुक
डॉ. प्रसाद उंबरकर यांच्या संवेदनशील कार्याला, तळमळीच्या जनजागृतीला आणि सामाजिक आरोग्याबद्दलच्या प्रयत्नांना सन्मानपूर्वक सलाम!
आपल्यासारखे डॉक्टर समाजासाठी आरोग्य आणि आशेचा किरण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *