महात्मा फुले कृषि विद्यापीठात कोरडवाहू फळपिकांच्या 29 व्या वार्षिक कार्यशाळेचे आयोजन…

Uncategorized

(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दिनांक 22 ते 24 ऑगस्ट, 2025 रोजी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन योजनेची 29 वी वार्षिक कार्यशाळा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या विज्ञान) डॉ. संजय कुमार सिंग हे उपस्थित असणार आहेत. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख भूषवणार असून या कार्यशाळेसाठी सन्माननीय अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे फळे आणि लागवड पिके योजनेचे सहाय्यक महासंचालक डॉ. व्ही.बी. पटेल उपस्थित राहणार आहेत. यावेळी भा.कृ.अ.प.-सी.आय.ए.एच, बिकानेरचे प्रकल्प समन्वयक डॉ. जगदीश राणे, भा.कृ.अ.प.-आय.आय.एच.आर., बंगळुरूचे प्रकल्प समन्वयक डॉ. प्रकाश पाटील, राहुरी कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. टी.ए. मोरे, कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन प्रकल्पाचे संचालक डॉ. राजीव मराठे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी.सी. त्रिपाठी, एस.डी.ए.यू, एसके नगर या विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सी. मुरलीधरन, पुणे येथील भा.कृ.अ.प- अटारीचे संचालक डॉ. एस.के. रॉय उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी देशातील विविध 11 राज्यातून 82 शास्त्रज्ञ, मान्यवर उपस्थित राहणार आहे. या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये प्रत्येक राज्यात कोरडवाहू फळांवरील सुरु असलेल्या संशोधनाचे सादरीकरण होणार आहे. सदर कार्यशाळेमध्ये कोरडवाहू फळपिकावरील संशोधनावर सखोल विचारविनिमय होऊन राष्ट्रीय पातळीवर शेतकर्यांसाठी नवीन शिफारशी प्रसारित करण्यात येणार आहेत. अशी माहिती उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *