जिओ और जिने दो या सिद्धांताने जगात शांती नांदेल:- आर्यिकारत्न प्रतिभामती माताजी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव दिगंबर जैन मंदिर येथे आचार्य श्री आर्जवसागरजी महाराज यांच्या शिष्या आर्यिका रत्न प्रतिभामती माताजी तसेच सुयोगमती माताजी व मार्मिकमती माताजी यांचा चातुर्मास चालू आहे या निमित्ताने सोलाकारण पर्वोनिमित्त विश्वशांती व लोककल्याण विधानाचे आयोजन करण्यात आले असून या विधानाने विश्वशांती व लोककल्याण होते अशी जैन समाजाची धारणा आहे.
यावेळी प्रवचनाव्दारे माताजी म्हणाल्या आज विश्वामध्ये हे माझे आणि तुझेंही माझेच ही वृत्ती बळकावली असुन त्यामुळे विश्व अस्तिर झाले आहे पण जैन सिद्धांतानुसार जिओ और जिने दो नुसार संपूर्ण विश्वास शांती नांदू शकते त्याग संयम तपस्या याने मानव जातीचे कल्याण होऊ शकते भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध महात्मा गांधी यांनी अहिंसेचा संदेश देत मानव जातीचा उद्धार केला आहे आज या आराजगतेमुळे निरप्राध लोक मारले जात आहेत त्यागाची परंपरा लुप्त झाली आहे वर्चस्वाची हाव वाढली आहे यासाठीच भारतीय संस्कृती महान आहे भारताने कधीही कोणावर आक्रमण केले नाही कोणाची जमीन बळकवली नाही भारतीयांवर भारतीय संस्कृती व अध्यात्मचा पगडा आहे आणि तो सदैव टिकावयासाठीच या विश्वशांती व लोक कल्याण विधान मंडळाचे आयोजन केले आहे ही पूजा दिनांक 9 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे हे दिनांक 25 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे या पूजेचा पहिला मान श्री महावीर व सीमा गंगवाल यांना मिळाला हे विधान रोज सकाळी साडेसहा ते साडेनऊ या दरम्यान चालते यात जैन भाविक मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत.
हे विधान यशस्वीतेसाठी दिगंबर जैन समाजाचे पंच आनंद काले, मोहित गंगवाल ,तसेच अध्यक्ष अजित भाऊ लोहाडे ,संतोष गंगवाल , मुन्ना पाटणी, विजय कासलीवाल, महावीर गंगवाल, विजय पहाडे, महावीर पांडे , आनंद गंगवाल, अजय पहाडे हे परिश्रम घेत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *