
कोपरगाव प्रतिनिधी
नैसर्गिक व मानवी जीवनात नद्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. याचबरोबर देशातील श्रीगंगामाते समान सर्वात जास्त लोकसंख्या , भूप्रदेश, धार्मिक तिर्थक्षेत्र, प्रभु रामचंद्रासह देवदेवतांच्या व स़ंत ,महात्मे, ऋषीमुनींच्या पदस्पर्श, आणि करकमलाने पवित्र झालेल्या दक्षिण गंगा गोदामातेच महत्व व महात्म्य कर्मयोगी जलभगिरथ स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी फार पूर्वीच ओळखलं. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या कोपरगांव परिसरात कोणत्याही स्वरूपात स्वतंत्र पाणी स्त्रोत उपलब्ध नाही. त्यातही येथील भूमातेच्या कपाळी दर पाच वर्षात दोन वर्षे दुष्काळ पाचवीला पुजला आहे.यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे गेल्या सत्तर वर्षांत सलगपणे मायबाप सरकारने कोपरगांव करांचे हक्काचे तोंडाचे पाणीच पळवित असतांनाच तालुक्याला कोणीच वाली नसल्याचे आर्विभावात नासिक, जिल्हा, आणि मराठवाड्यात पळविले अशा भिषण परिस्थितीत कोल्हे कुटुंबियांनी अहोरात्र सर्वस्व पणाला लावून या परिसरातील जनतेला संघटीत करून प्रसंगी स्वशासनाविरोधात प्रखर आत्मघातकी एकांगी लढे दिले. यामुळे वयैक्तिक जिवन व राजकिय दु:षपरिणाम या कुटुंबियांना कायमस्वरूपी अनेक वर्षांपासून भोगावे लागत आहे.
याशिवाय कोपरगांवात संपूर्ण देशात गोदावरी नदी उत्तर वाहिनी बनते हे एकमेव उदाहरण आहे, कुंभमेळा स्नान, पुत्रप्राप्तीसाठी जनक राजाने केलेला यज्ञ , कोणत्याही अनिष्ट काळात वर्षभर होणारे विवाह, नागबली विधी, आदी धार्मिक विधी शुक्राचार्य मंदिरात व परिसरात पार पाडले जातात.तसेच यापरिसराच्या भोवताली शेकडो प्राचिन अर्वाचीन तिर्थक्षेत्रे आहेत यामुळे हा परिसर कायम धार्मिक विधींसाठी देशातील भाविकांमुळे गजबजून जातो.
अशा पविञ भुमीची एकमेव जीवन वाहिनी असलेल्या गोदामाता पुजनांची परंपरा जोपासण्याचा विडा संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.विवेक भैय्या कोल्हे यांनी आपल्या संजीवनी प्रतिष्ठान च्या सहकार्यासह कोल्हे कुटुंबांनी उचलला आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष.बिपीन दादा कोल्हे, माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे, सौ.रेणुका ताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा दर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मोठ्या उत्साहात गोदावरी तीरी पार पाडला जातो.
दरवर्षी हजारो बाल-वृध्द, युवक -युवती, स्री-पुरुषांकडून सामुहिक रित्या प्रत्येक श्रावण महिन्यातील सोमवारी सायंकाळी गंगा पुजन कोपरगांव शहरातील गोदामातेच्या काठी संघटीतपणे केले जाते.यावेळी होणाऱ्या गंगापुजनास स्थानिकासह इतर तिर्थक्षेत्रामधील जेष्ठ श्रेष्ठ पुरोहितांना आवर्जून सन्मानित आमंत्रित केले जाते. तसेच याप्रसंगी श्री.बिपिन दादा कोल्हे यांचे सहकारी अहमदाबाद मधून आलेले साई मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बालकृष्ण भाई, गिरीश भाई, मोहम्मद भाई,अहमद भाई, घनश्याम भाई हे आवर्जून उपस्थित होते. पोलीस प्रशासन,पत्रकार बांधव,नगरपालिकेचे पदाधिकारी यांचे मोठे सहकार्य या कार्यक्रमात लाभले,या सर्वांच्या शुभ हस्ते व अधिपत्याखाली धार्मिक परंपरा जोपासत किमान एक-दीड तासांचा धार्मिक विधी कार्यक्रम हजारो उपस्थितांचे वतीने पार पाडला जातो. या निर्माण झालेल्या धार्मिक सर्वोच्च वातावरणात अंधाऱ्या संधी काळात हजारो दिपांचे मंद प्रकाश, सभोवताली डोळे दिपवून टाकणारी विद्द्यूत रोषणाई, विविध वाद्यांच्या
दणदणीत आवाजात, टाळ्यांच्या कडकडाटात, मंत्रोच्चारात, मनमुरादपणे भान हरपून नाचत सामूहिक गंगापूजन पार पाडले जाते. अशा प्रत्यक्ष मंगलमयी वातावरणांचे चित्रण शेकडो बाल, युवा, नागरिक आपल्या मोबाईल मध्ये करून जगभरात पोहोचवत असल्याने दरवर्षी विक्रमी गर्दी श्रावणी सोमवारी उत्स्फूर्त सहभागी होत असते. याप्रसंगी माजी आमदार सौ.स्नेहलता ताई कोल्हे यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभ मेळाव्या करिता नवीन घाट व अनेक धार्मिक विधी आयोजन करण्याचा विचार असल्याचा सांगितले. या कार्यक्रमाकरिता संजीवनी प्रतिष्ठानचे सर्व श्री.अमोल म्हस्के,सिद्धार्थ साठे,रोहित कणगरे,रवींद्र लचुरे,सतीश निकम यासह कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले यामुळे एक राखी जवानांसाठी, देशभक्तीला वाहिलेली भव्य दिव्य दहीहंडी संजीवनी प्रतिष्ठान यांचे नाव उभ्या महाराष्ट्रात गाजले आहे.
अशा भव्यदिव्य सामुदायिक गंगापूजनाचा पुण्य सेवा लाभ मिळवून दिल्याबद्दआयोजकांना धन्यवाद व दुवा देत प्रत्येक व्यक्ती आनंदात घरी पोहोचतो
अशा यशस्वी आयोजनासाठी आयोजित करण्यासाठी कोल्हे परिवारास परमेश्वराने सर्व प्रकारचे बल देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव.
मो.9822630330
