
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्रातील युवा सेनेची जोरदार बांधणी चालू असून महाराष्ट्रात शिवसेना व युवा सेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून तरुण मोठ्या संख्येने शिवसेना व युवा सेनेत दाखल होत असून येणाऱ्या काळात उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथम क्रमांक वर दिसेल सध्या उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे वरूण सरदेसाई सचिव आणि उपनेते महाराष्ट्र, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे युवा सेनेचे विस्तारक सुनील तिवारी उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे शहर प्रमुख कलविंदर सिंग दडीयाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराच्या युवा सेनेच्या शहर प्रमुख पदी शेखर कोलते यांची निवड करण्यात आली आहे शेखर कोलते हे बाल शिवसैनिक असून लहानपणापासूनच शिवसेनेचे बाळकडू त्यांच्या अंगी आहे शेखर कोलते हे लहानपणापासून शिवसेनेचे काम करत असून त्यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला आहे सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असतात शेखर कोलते यांना युवा सेनेचे शहर प्रमुख पदी निवड झाल्यामुळे तरुणांना संधी मिळत आहे
शिवसेना नेहमी गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येत असते या गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी शेखर कोलते हे काम करणार आहे यापूर्वी देखील ते असेच काम करत होते म्हणून त्यांना शहर प्रमुख पदाची संधी देण्यात आली आहे गरिबांचा आवाज बुंलद करून गरिबांच्या हक्कासाठी लढणारे शेखर कोलते यांना शहर प्रमुख पदाची जबाबदारी देऊन शहरातील गोरगरीब शोषित पीडित वंचित नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्न करतील यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी विकास शर्मा बाळासाहेब साळुंखेे आरोग्य सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल देशपांडे वाहतूक सेनेचेेेे जिल्हाप्रमुख इरफान पठाण वाहतूक सेनेचेेे शहर प्रमुख जाफर पठाण प्रफुल्ल शिंगाडे वर्षाताई शिंगाडे अश्विनीताई होणे शितलताई चव्हाण दिलीप आरगडे अशोक पवार मधुकर पवार रोशन पवार, युवा सेनेचे उपशहर प्रमुख आदित्य ठोंबरे, युवा सेनेचे तालुका प्रमुख विजय बोराडे, युवा सेनेचे उप शहर प्रमुख विजय सोनवणे, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख गणेश थोरात यांच्यासह विविध कार्यकारणीचे सदस्य्य पदाधिकारी मोठ्या संख्येनेेे उपस्थित होते
