प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी लसीकरण सत्र अतिशय शांततेत राबवले त्याच धर्तीवर कोपरगाव मध्ये राबविण्याचा मानस आहे; जनतेने सहकार्य करावे:- तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
या प्रमाणे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना लसिकरण सत्र बाबत सुचना दिल्या आहेत. लसिकरणासाठी आलेल्या सर्व नागरिकांची स्वतंत्र रजिस्टर मधे नोंद घेतली जाते. यामध्ये नाव, गाव आणि मोबाईल नंबर घेतला जातो. या नोंदणी नुसारच लस आलेल्या संख्येनुसार नागरिकांना आशा सेविकां मार्फत फोन केला जातो.नोंदणी करतानाच नागरिकांना आशा सेविकांमार्फत फोन आले शिवाय लसिसाठी येऊ नये असा सल्ला दिला जातो. यामुळे नागरिकांची होणारी गर्दी आणि होणारे हेलपाटे वाचत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी यांनी काल झालेले लसिकरण सत्र याप्रमाणे अतिशय शांततेत आयोजित करून दाखवले आहे. ईतर प्राथमिक आरोग्य केंद्रात ही याप्रमाणे नियोजन होणार आहे.
डाॅ. संतोष विधाते
तालुका आरोग्य अधिकारी
पं. स. कोपरगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *