“आरक्षणाची वाट न पाहता गरीब मराठ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी”:-अँड.सोनल पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्रातील सत्तेत असलेल्या मराठा नेत्यांनी आरक्षणाची वाट न पाहता गरीब मराठ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन अँड.सोनल कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
आपल्या पत्रकात अँड सोनल कदम म्हणाल्या की महाराष्ट्र राज्यामध्ये निवडक मराठा नेत्यांच्या ताब्यात अनेक साखर कारखाने, शिक्षण संस्था,दूध संघ, विविध महाविद्यालये, सुत गिरण्या मेडिकल कॉलेज अशा विविध संस्था असून हे नेते वर्षानुवर्षे या संस्थेचा वापर आपले कुटुंब सुरक्षित करण्यासाठी राजकीय अड्डे म्हणून करत असून या संस्थेच्या माध्यमातून भोळ्या भाबड्या मराठा समाजाची दिशाभूल करत आहे
मागील काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले मात्र या राजकीय नेत्यांनी या संघटित मोर्चाचा लाभ स्वतःचे राजकारण सुरक्षित करण्यासाठी केला युती व आघाडी शासनाने आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य तो पाठपुरावा न करता केवळ गोरगरीब जनतेची दिशाभूल करण्यासाठी केला असून महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना खरोखर मराठा बांधवांच्या आर्थिक सामाजिक उन्नतीचा कळवळा असेल तर आरक्षणाची वाट न पाहता आपल्या ताब्यातील सर्व संस्थांमध्ये प्रवेश न देता मॅनेजमेंट कोठ्यातून आपल्या बगल बच्याना संधी न देता गोरगरीब बांधवाना शैक्षणिक संधी द्यावी व नोकरी साठी लाखो रुपयांची अट न घालता नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यास मराठा समाजात आर्थिक व शैक्षणिक उन्नती होईल असे त्यामुळे या राजकीय नेत्यांनी आरक्षणाची वाट न पाहता गोर गरीब मराठ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी असे या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *