
कोपरगाव प्रतिनिधी:-
शासनाने कोरोना लसीकरणासाठी ऑन लाईन नोंदणीची अट घातल्याने अनेकांना अडचण निर्माण झाली आहे.18 ते 44 या वयोगटातील अनेक नागरिक अशिक्षित आहेत,अनेकांकडे साधे मोबाईलही नसल्याने त्यांना ऑन लाईन नोंदणी करता येत नाही.त्यामुळे ते लसीकरणापासून वंचित राहू शकतात.म्हणून लसीकरण केंद्रावरच नोंदणीची सोय करावी.या कामासाठी सामाजिक संस्था,व्यक्ती यांचीही मदत घेता येऊ शकते.सध्या लस पुरेशा प्रमाणांत उपलब्ध नाही.लोक लसीकरण करून घेण्यासाठी रांगा लावतात,उन्हामुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागतो.म्हणून टोकन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.लस मात्रा उपलब्ध असतील तितकेच टोकन वाटप करून उरलेल्या लोकांना घरी जाऊ द्यावे. रांगेतील गर्दीमध्ये कुणी कोरोना पोसीटीव्ह असेल तर प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.रांगेत उभे रहायचे व लस संपल्यावर लस न घेताच घरी जायचे असे प्रकार टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब करावा.45 वर्षावरील अनेक जेष्ठ नागरिकांनाही रांगेत उभे राहण्याचा व हेलपाटे मारण्याचा त्रास होऊ नये असेच नियोजन करावे
—विजय वहाडणे
