डॉ.सी.व्ही. रमन बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेस ’आत्मा मालिक अव्वल’; ’ 37 विद्यार्थी गुणवत्ता यादीत ’ तर श्रेयष नलावडे राज्यात प्रथम…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी :-जनसेवा सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठान आयोजीत राज्यस्तरीय डॉ. सी.व्ही रमन बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या 37 विद्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या मध्ये श्रेयश नलावडे हा राज्यात प्रथम आला असून श्रेयष भवर राज्यात तृतिय, उन्नती सात्रस व मनस्वी सोनवणे राज्यात पाचव्या स्थानी चमकले आहेत.

        विद्यार्थ्यामध्ये संशोधनात्मक वृत्ती वाढविणे, विज्ञानाची अभिरुची व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा या परीक्षेमागील मुख्य उद्देश असून आत्मा मालिकमध्ये विज्ञान विषयाचे विविध उपक्रम राबविले जातात. तसेच विज्ञानाच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेतली जाते. त्यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय विज्ञान कार्यशाळेसाठी निवड झालेली आहे.
        यामध्ये यश कणके, स्वरा झावरे, धनंजय दहिफळे, श्लोक कदम, सुजितकुमार गोल्हार, धनश्री रक्ताटे, तनिष्क शिंदे हे विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चमकले. सिध्दार्थ भोसले, राज हासे, तनिष्का कोरडे, सुयश शिंदे, विश्वजीत त्र्यंबके, प्रांजल काळे, करण चारवंडे, शुभांगी गोलांडे, युविका पराडके, आराध्य गुरसळ, दर्शन गिरासे, श्रीतेज इंगोले, ज्ञानेश्वरी काळे, सिध्दार्थ पगारे, स्वरुप शेळके, भावेश पाचारणे, भाविका देवरे, आराध्य दिघे, मंगेश कदम, राजवीर कालेकर, नयन कणकाल, आदित्य पाटोळे, तेजस चोंडगीर, तन्मय गाडेकर, मल्हार कजबाजे, सार्थक पाटील या विद्यार्थ्यानी तालुका गुणवत्ता यादीत बाजी मारली आहे.
        या विद्यार्थ्याना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, मीना नरवडे, सागर आहिरे, रविंद्र देठे, रमेश कालेकर, बाळकृष्ण दौंड, पर्यवेक्षक गणेश रासने, नयना शेटे, सुनिल पाटील, नितीन अनाप यांचे मार्गदर्शन लाभले.
        यशस्वी विद्यार्थ्याचे परमपुज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशिर्वादासह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, प्राचार्य निरंजन डांगे आदिंनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *