संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातुन रुग्णांचे आरोग्य जपण्यास निष्चितच मदत होणार:- प्रातांधिकारी गोविंद शिंदे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने सुरु केलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये उत्कृष्ट नियोजन केलेले असुन तेथे वैद्यकीय उपचार घेणा-या रुग्णांचे आरोग्य जपण्यास निष्चितच मदत होणार आहे. यासाठी संजीवनी समुहाचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा प्रातांधिकारी श्री. गोविंद शिंदे यांनी केले.

आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने सुरु केलेल्या कोविड सेंटरला श्री शिंदे यांनी भेट दिली त्यांचे समावेत तहसिलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते, डाॅ. वैशाली आव्हाड, संजीवनी कोविड केअर सेंटरचे समन्वयक उपस्थित होते.


प्रातंधिकारी श्री. गोविंद शिंदे पुढे बोलतांना म्हणाले की, रुग्णांना निश्चितच चांगले उपचार मिळतील अशी व्यवस्था संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने करण्यात आली आहे. या कामासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य राहील. रुग्णाचा प्राथमिक अहवाल हा सकारात्मक आल्यास तात्काळ संजीवनी कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होवुन उपचार घ्यावा. कोरोना ची रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येणारा काळ कसोटीचा आहे. 400 बेड चे सुरु केलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपचार देण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था केली असल्याचे प्रातंधिकारी शिंदे म्हणाले. यांच्यासह प्रांतधिकारी शिंदे च्यासह उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांनी देखील कोविड सेंटरमधील बेड व्यवस्थेसह इतर उपलब्ध करुन दिलेल्या सोयी सुविधांची पाहणी करुन रुग्णांच्या उपचारा बरोबर त्यांचे आरोग्य निष्चितच आबाधित ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे पाहुन प्रषासकीय अधिका-यांच्या वतीने यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *