
कोपरगाव प्रतिनिधी:-
पक्ष सत्तेत असो वा नसो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रभागी असलेला पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनेचा आज वर्धापन दिन. हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर मार्मिक फटकारे मारणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळविले.

साडेपाच दशकांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत असल्याने त्याचा फायदा पक्षाला होत आहे. तसेच उत्तरनगर जिल्ह्यात ज्यांची प्रामाणिक व कडवट शिवसैनिक म्हणुन ओळख आहे असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली वर्धापनदनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले ज्यात शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना मोरे व युवतीसेनेच्या अक्षिता आमले यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, अहमदनगर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या माजी पदाधिकारी यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील “कोविड योद्धा” म्हणून भूमिका बजावणाऱ्या विविध हॉस्पिटलमधील नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये संपूर्ण किराणा किट व मिठाई वाटप करण्यात आले, विभागप्रमुख मयूर दळवी यांनी प्रभाग क्रमांक ५ मध्ये जंतुनाशक औषध फवारणी करून सामाजिक बांधिलकी जपली व शहर शिवसेनेच्या वतीने ५५ किलो साजूक गावरान तुपाचे लाडू शिवसैनिकांना वाटण्यात आले व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.



या वेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे मा.जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, एसटी कामगार सेना शहरप्रमुख भरत मोरे, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,अमजद शेख, शहर संघटक बाळासाहेब साळुंखे उपशहरप्रमुख विकास शर्मा ,
गगन हाडा,आकाश कानडे, निशांत झावरे,ग्राहक संरक्षण कक्षाचे रिकेश जाधव विभाग प्रमुख राहुल हंसवाल, शिवसैनिक मंगेश देशमुख,अक्षय जगताप,वैभव हलवाई,उमेश छूगाणी, रामदास शिंदे, अनिल चव्हाण, विजय खंडागळे,पंकज मोरे, वैभव गिते, जुबेद अत्तर ,कृष्णा दळवी अमोल देवकर,समाधान कंदे, किरण घेगडमल,संकेत मंडलिक इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदी शिवसैनिक उपस्थित होते.
