प्रा.सुभाषजी शिंदे यांना भावपुर्ण श्रद्धांजली:- विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
जनतेसाठी लढणारे-गाऱ्हाणी वेशीवर टांगणारे तुम्ही
आज स्वतःलाच टांगून घेतले
तुम्ही गेलात जीवानिशी
पण आम्हा सर्वांच्याच जीवावर बेतले
राजबिंडा माणूस गेला
ताठमानेने जगणारा-वागणारा
सामान्यांकडे आत्मीयतेने बघणारा
कुटुंबच नव्हे तर मित्र सहकाऱ्यांनाही आले पोरकेपण
पटेचना मनाला अन कुणालाही
सर आपल्यातून गेले
तुम्ही घडविलेले विद्यार्थी
अन मित्र जिवाभावाचे
सैरभर झालेत सारेजण
हळहळले प्रत्येक मन
कोरोनालाही हरविले
मग अचानक जायचे का
ठरविले
अनेक दिवस सहकारी एकत्र
नव्हते आले,भेटणे बोलणे नव्हते
झाले
सतत प्रत्येकाशी बोलणारे
भाऊबंद,नातलगांची जवळीक
सांगणारे
मुकपणे निघून गेले
मी चाललोय माझ्याच मर्जीने
असेही लिहून गेले
चुकलोच आम्ही कधी तर
स्पष्ट निक्षून सांगणारे
एक एक निघून चाललेत
एकमेकांना सावरणारे
विस्कटलेले आवरणारे
आज तर मोडूनच पडला
सर्वांचाच आधार अन कणा निष्ठावानही गडबडलेले पाहिलेत
निष्ठांचा बाजार पाहून
पण सर,तुम्ही तर घेतले होते विचार अन निष्ठांनाच वाहून
ध्वज विचारांचा-पक्षाचा
अखेरपर्यंत तुमच्या हाती
सांभाळलीत तुम्हीच सरळ साध्या
सहकाऱ्यांची नाती
बोलायचे, सांगायचे असे किती तरी गेले असेल राहून
अनेकांना निरुत्तर करणारे ठणकावणारे तुम्हीच गेलात
आज प्रत्येकजणच दुःखात
सर,तुम्हाला असे मूक पाहून
विजय वहाडणे…

स्व.प्रा.सुभाषजी शिंदे सर
विनम्र श्रद्धांजली।।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *